CORONA UPDATE | LOCKDOWN | लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवा

आयएमएचे मुख्यमंत्र्यांना पत्र; कोविडची साखळी तोडण्यासाठी आणखिन १५ दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्यात सोमवार 3 मेपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन पुढील पंधरवड्यापर्यंत वाढविण्यात यावा, असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिलाय. राज्यातील नव्या प्रकरणांची टक्केवारी सध्याच्या 50 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर येईपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणं गरजेचं आहे तरच ही साखळी तोडणं शक्य होईल, असंही संघटनेने सुचवलेलं आहे. राज्य सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचंही संघटनेने स्वागत केलं आहे.

कोविडची साखळी तोडण्यासाठी आणखिन १५ दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी अकस्मात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्यावेळी परिस्थितीच तशी होती. या लॉकडाऊनचा अनुभव घेतल्यास सध्याच्या परिस्थितीत वाढती प्रकरणं आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्याचं जबरदस्त आव्हान आयोग्य यंत्रणेसमोर आहे. या गोष्टीसाठी केवळ तीन दिवसांचं लॉकडाऊन कामी येणार नाही. लॉकडाऊनचा अनुभव आता लोकांना आलाय आणि आरोग्यासाठी कशा पद्धतीनं तडजोड करावी याचंही ज्ञान त्यांना प्राप्त झालंय. लोकांना आता या महामारीचे गांभिर्य चांगलंच लक्षात आलंय आणि त्यामुळे लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवला तरी लोक ते स्विकारणार आहे. सध्या आरोग्य यंत्रणांवर तसंच आरोग्य मनुष्यबळावर प्रचंड ताण आहे. आरोग्य मनुष्यबळाची ताकद पूर्णपणे पणाला लागलीय. लॉकडाऊनच्या माध्यमाने वाढत्या नव्या प्रकरणांना आळा घातला जाऊ शकतो जेणेकरून आपोआप आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होण्यात मदत होईल. राज्यातील कोरोनाचा ग्राफ आपल्याला खाली आणायचा असेल तर कडक उपाययोजना आखण्यावाचून अन्य पर्याय नाही, असंही संघटनेनं सुचवलं आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी यांनी हे पत्र लिहीलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!