रेल्वे सुरक्षा दलाकडून अवैध दारूसाठा जप्त, एकजण ताब्यात

मद्याची अवैधपणे वाहतूक करतानाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत अवैध दारुसाठा जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून रेल्वेतून गोव्यातील मद्याची अवैधपणे वाहतूक करतानाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत अवैध दारुसाठा जप्त केला तर एकास ताब्यात घेतलेले आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून दोन्ही संशयितांसह जप्त केलेला मद्यसाठा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस आर. पी. यादव हे शुक्रवारी रात्री मडगाव रेल्वेस्थानकाच्या एक नंबर फलाटावर गस्त घालत असताना त्यांना फलाटावर एक व्यक्ती तीन पिशव्या घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्यांनी चौकशी केली असता योग्य उत्तरे न मिळाल्याने पिशव्यांची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याच्या बाजारभावानुसार ९०५८ रुपये किमतीच्या एकूण ११३ बॉटल्स आढळून आल्या. रेल्वे सुरक्षा दलाकडून मद्यसाठा जप्त करत संशयित सुजित यादव (वय ३८, रा. नाशिक) याला ताब्यात घेतले.

हेही वाचाः सुमारे ७०० खासगी बसेस सरकार घेणार भाड्याने !

दुसऱ्या घटनेत रेल्वे फलाटावर एक पिशवी आढळली. त्यात सुमारे अडीच हजार रुपयांची गावठी दारू आढळून आली. दोन्ही प्रकरणे रेल्वे सुरक्षा दलाकडून नोंद करत मद्यसाठी अबकारी खात्याकडे देण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!