पत्रादेवी येथे गोवा अबकारी खात्याने अवैध दारू पकडली

सुमारे १२ लाखांची दारू जप्त; वाहनचालक फरार

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पत्रादेवी चेक नाक्यावर अबकारी विभागाने निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या नैतृत्वाखाली 12 लाख 14 हजारा 880 रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनाची किंमत 17 लाख आहे.

गोव्यातून पनवेल येथे चालले होते वाहन

अबकारी विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे वाहन गोव्यातून पनवेल येथे जात होते. गुरुवारी पहाटे साडे सात वाजता हे वाहन पत्रादेवी अबकारी चेकनाक्यावर पोचलं. त्यावेळी चालक आपली कागदपत्रे घेऊन नाक्यावर आलाच नाही. कुठे जातो असं विचारलं तर उत्तर देऊ शकला नाही. वाहन तपासण्यात अधिकारी मग्न असतात वाहन चालक वाहनाची चावी घेऊन फरार झाला. एम एच 16 सीसी 8200 क्रमांकाच्या वाहनाच्या परमिटाची नकली प्रत यावेळी तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना वाहनात सापडली, तर एकाचं आधार काड सापडलं. अबकारी अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पूर्ण वाहनाची तपासणी केली असताना त्यांना वाहनात बिअरचे 330 बॉक्स, शिवाय विदेशी बनावटीची दारू सापडली. हे क्रमांकाचे वाहन जप्त केले.

अबकारी अधिकाऱ्यांची कोरोना काळातील चौथी मोठी कारवाई

या धडक कारवाईत निरीक्षक अमोल हरवळकर, दिलीप तिळवे, निलेश गावडे, शंकर पर्येकर, देविदास नाईक, विठोबा मालवणकर आणि सतीश तिळवे यांचा समावेश होता. कोरोना काळातील ही चौथी मोठी कारवाई आहे. या नाक्यावरून अनेकवेळा बेकायदा दारूचा व्यवहार चालू असतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!