‘या’ तालुक्यात उभारणार आयआयटी प्रकल्प…

वाळपई मतदारसंघात आयआयटी प्रकल्प उभारण्याचे आधी निश्चित केले होते

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सरकारने वाळपई मतदारसंघातील गुळेली पंचायत क्षेत्रात आयआयटी प्रकल्प उभारण्याचे आधी निश्चित केले होते. पण, तेथील स्थानिकांचा विरोध झाल्याने तो प्रकल्प सरकारने रद्द केला आहे. त्यानंतर आयआयटी स्थापन करण्यासाठी जागेचा शोध घेणे सुरू होते. त्यासाठी सरकारने खास समितीची स्थापना केली होती. या समितीने सध्या सांगे तालुक्यातील जागेची निवड केली आहे.
हेही वाचाःओबीसी दाखल्यासाठी ‘ती’ अट रद्द करावी…

सरकारची या ठिकाणाला पसंती

सांगे तालुका आयआयटीसाठी योग्य ठिकाण आहे. सरकारचीही याला पसंती आहे, असे सुतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केले आहे. नेत्रावळी येथील सरकारी विद्यालयात सांगे मतदारसंघासाठी ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, जितेंद्र नाईक, राजेश गावकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने मोलेतून जाणाऱ्या रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने दिलेला परवाना रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालय जो आदेश देईल. त्याचे सरकार पालन करेल.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!