ब्रेकिंग | IITविरोधात शस्त्र घेऊन आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे न घेण्यावर सरकार ठाम

अतिरिक्त सरकारी वकीलांची माहिती

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

ब्युरो : जानेवारी महिन्यात शेळ मेळावलीतील आयआयटीविरोधातील आंदोलन प्रचंड गाजलं. याच आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. टोकाचा संघर्ष शेळ-मेळावलीत पाहायला मिळाला होता. दरम्यान, या आंदोलनावर पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्रीही पाहायला मिळाली होती. दरम्यान, या सर्व धुमश्चक्रीमध्ये झालेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी अनेकांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र शस्त्र घेऊन आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे न घेण्यावर सरकार ठाम असल्याचं पाहायला मिळतंय.

हेही वाचा – Video | बघाच! मेळावलीत पोलिसानं महिलेच्या पोटावर पाय दिला?

काय म्हणाले सरकारी वकील?

अतिरिक्त सरकारी वकील प्रवीण फळदेसाई यांच्याशी गोवनवार्ता लाईव्हचे प्रतिनिधी प्रसाद शेट काणकोणकर यांनी बातचीत केली. त्यावेळी हायकोर्टात झालेल्या युक्तीवादावर फळदेसाईं यांनी सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट केलंय. शेळ मेळावलीत काहींनी शस्त्र घेऊन आंदोलन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसं रेकॉर्डवरही आलं असल्याचं फळदेसाईंनी म्हटलंय. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण सशस्त्र आंदोलनाला कुणीच समर्थन देऊ शकत नाही. त्यामुळे शस्त्र घेऊन आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे न घेण्यावर सरकार ठाम असल्याचा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला आहे.

800x450 iit police

नवा संघर्ष

तीव्र विरोधानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही आयआयटी सत्तरीत नको, असं म्हणत स्थानिकांच्या विरोधाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेत आयआयटीचा शेळ मेळावलीतील प्रकल्प रद्द करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. आयआयटी प्रकल्प जरी रद्द करण्यात आला असला, तरी आयआयटीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे हा अजूनही गंभीर प्रश्न स्थानिकांना भेडसावतो आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या आंदोलनावरुन गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेण्यावर सरकार ठाम आहे. त्यामुळे आता यासाठी आणकी एक लढा सत्तरीवासीयांना द्यावा लागतो की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

हेही वाचा – बातमी आणि Video | मेळावलीचं सगळंकाही एका क्लिकवर!

हेही वाचा – ‘हे’ १५ पोलिस मेळावलीतील धुमश्चक्रीत जखमी

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!