आयआयटी आंदोलनातील या 21 जणांवर गंभीर गुन्हे दाखल

कोणत्याही परिस्थितीत शेळ मेळावलीत आयआयटी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांच विधान

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: सत्तरीतील शेळ मेळावली आयआयटी आंदोलनातील 21 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची हत्या करण्याचा प्रयत्न, मालमत्तेची नासधुस, सरकारी कामांत व्यत्यय, बेकायदा जमाव, नियोजनबद्ध हल्ला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

दोघांना अटक, इतरांची कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

21 जणांपैकी वाळपईचे विश्वेष प्रभू परोब आणि शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक करण्यात आलीय. तर उर्वरीतांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. गुन्हा दाखल केलेल्यांत रामा काणकोणकर, डायना त्रावासो, शंकर देवळी, निखिता नाईक, उन्नती मेळेकर, पुजा मेळेकर, संध्या मेळेकर, शुभम शिवोलकर, प्रियेश नाईक, शशिकांत सावर्डेकर, शशिकला सावर्डेकर, विश्वेष प्रभू परब, दशरथ सांगोडकर, रणजित राणे, जनार्धन भंडारी, दशरथ मांद्रेकर, संकल्प आमोणकर, सचिन भगत, रोशन देसाई, मनोज परब, रोहन कळंगुटकर व इतर ग्रामस्थ असा उल्लेख करण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!