IGNOU च्या सत्र परीक्षांचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

अर्ज करण्याची मुदत 12 जुलैपर्यंत वाढवली; 3 ऑगस्टपासून परीक्षांना सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जूनमध्ये होणाऱ्या सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची लिंक पुन्हा चालू केली आहे. इग्यूकडून सत्र परीक्षा 2021 चं आयोजन 15 जूनपासून करण्यात येणार होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची वाढती रुग्णसंख्या पाहता ते लांबणीवर टाकण्यात आलं आहे. नवीन सूचनेनुसार इग्नूच्या परीक्षा 3 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहेत. इग्नूच्या जूनमधील सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 12 जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

हेही वाचाः नवे राज्यपाल १५ जुलै रोजी घेणार शपथ

ignou.ac.in या वेबसाईटवर भेट द्यावी

इग्नूने जून 2021 टर्म-एंड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म जमा करण्यासाठी मुदत 9 जुलैपर्यंत वाढवून दिली होती. ऑनलाईन लिंक सुरु ठेवण्यात आली असून विद्यार्थी इग्नूच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांकडून आनलाईन अर्ज जमा केले जात आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ignou.ac.in या वेबसाईटवर भेट द्यावी.

हेही वाचाः ४० लाखांच्या तीन गाड्यांवरून मडगाव पालिकेत वाद

इग्नू टर्म एंड परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?

  1. सर्वात आधी ignou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. त्यानंतर होमपेजवर जाऊन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
  3. होमपेज उघडेल. त्यावर Term End Exam या लिंकवर क्लिक करा
  4. अर्जामधील माहिती अचूकपणे भरा

हेही वाचाः महागाईचा भडका! अमूलनंतर आता मदर डेरीनंही वाढवले दुधाचे दर

शुल्कही ऑनलाईन भरावे लागणार

शेवटी तुम्हाला नोंदणी शुल्क भरण्याचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन शुल्क भरल्यानंतर तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. भविष्यात कोणतीही अडचण होऊ नये म्हणून तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता. विद्यार्थी त्यांचे परीक्षा अर्ज इग्नूच्या वेबसाईटवर जाऊन भरू शकतात. 12 जुलैपर्यंत कसल्याही प्रकारचं विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. तर प्रत्येक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना 200 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. ते परीक्षा शुल्क कोणत्याही कारणामुळे परत केलं जाणार नाही.

हेही वाचाः CURFEW | कर्फ्यूचा कालावधी आणखी वाढणार

3 ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात

इग्नूच्या जून सत्राच्या परीक्षांना 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. इग्नूच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे. अभ्यासक्रमनिहाय परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी यासाठी नियमितपणे इग्नूच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!