दत्तप्रसाद, सिद्धार्थ, उत्पलकडे तूर्तास दुर्लक्ष

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं धोरण; बाबूशच्या मतानुसार मनपात पुढे जाण्याचे निश्चित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी जाहीर केलेल्या पणजी महापालिका निवडणुकीच्या भाजप पुरस्कृत पॅनेलमुळे नाराज झालेल्या उत्पल पर्रीकर, सिद्धार्थ कुंकळ्येकर, दत्तप्रसाद नाईक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे तूर्तास दुर्लक्ष करण्याचं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ठरवल्याची माहिती भाजपच्या गटातून मिळाली आहे.

आमदार फोडण्यात बाबूश मॉन्सेरात यांचा मोठा वाटा

काँग्रेसच्या दहा आमदारांना फोडून भाजपमध्ये आणण्यात आमदार बाबूश मॉन्सेरात यांचा मोठा वाटा आहे. शिवाय पणजी, ताळगाव, सांताक्रूझ या तीन मतदारसंघांवर आमदार बाबूश यांचं पूर्ण वर्चस्व आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयश्री खेचून आणायची असेल तर बाबूश यांना जपणं अत्यंत गरजेचं आहे. अशावेळी पक्षातील नेत्यांकडे काहीकाळ दुर्लक्ष करून पणजी मनपा निवडणुकीत बाबूश यांच्या मताप्रमाणेच पुढे जाण्याचं आणि मनपा निवडणूक जिंकण्याचं ज्येष्ठ नेत्यांनी एकमताने ठरवलं आहे, अशी माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

पण सर्वांनीच मौन बाळगलं…

मनपातील पॅनेलवरून भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक, पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर तसंच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दत्तप्रसाद नाईक यांनी तर थेट संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरच खापर फोडत मनपातील पॅनेल पक्षाचं नसून खासगी असल्याचा आरोप केला आहे. यावरून शुक्रवारी दिवसभर पक्षातील काही नेत्यांत चलबिचल सुरू होती. पण, सर्वांनीच त्यावर मौन बाळगणं पसंत केलं.

हेही वाचाः आरक्षणाचा अधिकार सरकारचा, हस्तक्षेप करणार नाही!

हेही वाचाः राजकारण आणि सभापती | आमदार अपात्रेवर सभापतींनी जे म्हटलं त्याच्या शक्यता सोप्या शब्दांत

नाईक यांच्याकडून स्पष्टीकरण घेणार : तानावडे

दत्तप्रसाद नाईक यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची प्रतिक्रिया विचारली असता, आपण दत्तप्रसाद नाईक यांना बोलवून घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा करू, त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेऊ इतकंच सांगून त्यांनी फोन बंद केला.

अनेकांनी बाबूशशी जवळीक वाढवली

आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी पॅनलमध्ये ज्या मूळ भाजप कार्यकर्त्यांना संधी दिली आहे, त्यातील काही जणांनी बाबूश यांच्याशी जवळीक वाढवली आहे. तर बाबूश यांना आजही विरोध करणारे पण आपलं नाव पॅनेलमध्ये असलेले काही उमेदवारही नाराज आहेत. पण पक्षाच्या आदेशानुसारच पुढे जाण्याचं धोरण त्यांनी निश्चित केल्याचीही माहिती प्राप्त झालीये.

हेही वाचाः भाजप निष्ठावंतांचे उघड बंड!

हेही पहाः ELECTIONS | नगरपालिका मतदान बॅलेट पेपरद्वारे

हेही पहाः EXCLUSIVE INTERVIEW | गोवा निवडणूक आयोग सरकारच्या हातातलं बाहुलं झालय?

हेही वाचाः राज्याच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचं लक्ष

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!