IFFI | 52 व्या इफ्फीच्या तारखा ठरल्या

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांच्या हस्ते इफ्फीच्या पोस्टरचं प्रकाशन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आशिया खंडातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आणि भारतातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी 2021’च्या तारखा ठरल्यात. यंदाचा 52 वा इफ्फी महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या काळात होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांकडून करण्यात आलीये. सोमवारी त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिलीये.

हेही वाचाः रानडुकर उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया गतिमान

पोस्टर आणि नियमावली पुस्तकाचं प्रकाशन

सोमवारी 5 जुलै रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांच्या हस्ते इफ्फीच्या 52 व्या इफ्फीचं पोस्टर तसंच नियमावलीचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन कार्यक्रमाचे फोटोज जावडेकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेत. हे फोटोज शेअर करताना त्यांनी 52 व्या इफ्फीच्या तारखा जाहीर केल्यात.

इफ्फीचा इतिहास

सिनेमानिर्मितीचा उत्सव साजरा करणारं इफ्फी हे जगातील अत्यंत सशक्त व्यासपीठ आहे. चित्रपट चाहते दरवर्षी इफ्फीची आतुरतेने वाट पाहत असतात. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला २१ फेब्रुवारी १९५२ साली सुरुवात झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ साली ‘ फिल्म डिव्हीजन’ची स्थापना झाली आणि याच फिल्म डिव्हिजनच – माहिती प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत पार पडला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं होतं.

हेही वाचाः सिरिशा बांडला ठरणार अंतराळात जाणारी दुसरी भारतीय वंशाची महिला

गेली 17 वर्षं इफ्फी गोव्यात

इफ्फीचं आयोजन स्थान काय असावं याबाबत मतभेद होऊ लागले तेव्हा दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, त्रिवेंद्रम, कोलकाता अशा शहरांमध्ये हा महोत्सव ३४ वर्षे फिरता राहिला. कान इथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखं इफ्फीला देखील कायमचं, पक्कं असं स्थान मिळायला हवं, इफ्फी जागेच्या दृष्टीने स्थिर व्हायला हवी यासाठी हालचाली सुरु झाल्या. इफ्फीच्या पस्तीसाव्या वर्षी सुषमा स्वराज ‘माहिती प्रसारण मंत्री’ आणि मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना गोव्याला तो मान मिळाला. गेल्या सतरा वर्षात इफ्फी गोव्यात स्थिरावला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!