‘वाइफ ऑफ अ स्पाय’ चित्रपटानं 51व्या इफ्फीचा रविवारी समारोप

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : पणजीत सुरू असलेल्या 51व्या इफ्फीचा समारोप रविवारी होणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री झिनत अमान, केंद्रीय मंत्री तथा गायक बाबुल सुप्रियो तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाच्या सावटाखाली पणजीत सुरू झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा म्हणजेच इफ्फीचा समारोप रविवारी होणार आहे. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच समारोप सोहळ्यातही स्थानिक कलाकारांना संधी दिली जाणार आहे.
नोव्हेंबरमध्ये 52व्या इफ्फीचं आयोजन
येत्या नोव्हेंबरमध्ये 52व्या इफ्फीचं आयोजन पणजीत होईल, असंही फळदेसाई म्हणाले. वाइफ ऑफ अ स्पाय हा इफ्फीचा समारोपाचा चित्रपट असेल. दरम्यान, इफ्फीच्या समारोपानंतर इफ्फीनिमित्त केलेली सजावट दोन दिवसांसाठी सर्वांना पाहण्यासाठी खुली असेल, असं फळदेसाई यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय.