दहा हजार नोकऱ्या दिल्यास महिना ४० कोटींचा भार

येत्या ६ महिन्यांच्या काळात वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये १० हजार पदे भरणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: दहा हजार नोकऱ्या दिल्यास सरकारी तिजोरीवर केवळ महिनाकाठीच वेतनाचा अतिरिक्त ४० कोटी रुपये भार पडणार आहे. याचाच अर्थ वर्षाकाठी तब्बल ४८० कोटी रुपये बाहेर काढावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी येत्या ६ महिन्यांच्या काळात वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये १० हजार पदे भरणार असल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचाः नववीत शिकणाऱ्या गोव्यातील ‘या’ तीन मुलांनी केली कमाल

900 हून अधिक पोलिस शिपायांच्या भरतीसाठी पुढील महिन्यात

पुढील महिन्यात काही पदांसाठी लेखी परीक्षाही घेतल्या जातील. या पदांसाठी आधी जाहिराती दिल्या होत्या. पोलिस खात्यात जास्त पदे आहेत. 900 हून अधिक पोलिस शिपायांच्या भरतीसाठी पुढील महिन्यात चाचणी होणार आहे.

हेही वाचाः ACCIDENT | डिचोलीत कार-दुचाकीची टक्कर

वेतनाचा प्रचंड भार सरकारी तिजोरीवर

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू असल्यानं सध्याच वेतनाचा प्रचंड भार सरकारी तिजोरीवर आहे. त्यामुळे हे आणखी ओझं सरकारला पेलवणार का, हासुद्धा मोठा प्रश्न आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!