निवडून आल्यास वर्षभरात ‘आप’ सोनसोडचा प्रश्न सोडवेल

'आप'च्या संदेश तळेकर देसाईंचे आश्वासन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आम आदमी पार्टीचे फातोर्डा येथील उमेदवार संदेश तळेकर देसाई यांनी पक्षाची सत्ता आल्यास एक वर्षात सोंसडोचा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही फातोर्डातील जनतेला दिली आहे. देसाई यांनी दावा केला की राज्य सरकार दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सोनसोडो वारसा कचरा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे मडगाव आणि फातोर्डा रहिवाशांना कचरा समस्येचा सामना करावा लागत आहे.

आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध

मंगळवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना देसाई म्हणाले, कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यासोबतच या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या आणि कचरा व्यवस्थापन हाताळण्यासाठी तयार असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडे उपलब्ध आहे. मात्र, काही स्वार्थी हेतूंमुळे सरकारने कचरा व्यवस्थापनाच्या समस्या सोडवल्या जात नाही. अखंडीत पाणीपुरवठा आणि वीज, चांगले रस्ते, घरोघरी सेवा यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच, ‘आप’ सरकार आल्यास वर्षभरात सोनसोडांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल, असं त्यांनी सांगितलं.

फातोर्डा येथील लोकांच्या विकासावर मी भर देईन

फातोर्डा येथील लोकांच्या विकासावर मी भर देईन, त्यात स्थानिक तरुणांसाठी क्रीडा अकादमी उभारणे आणि स्थानिक शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन विकण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे यासह एक मनोरंजन केंद्र स्थापन करण्याची माझी इच्छा आहे. मतदारसंघातील बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी पर्यावरणपूरक उद्योग सुरू करण्याचा माझा मानस आहे, शिवाय त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त करणे आणि मदत करणे यावर भर दिला जाणार, असं देसाई म्हणाले.

हेही वाचाः मोरजीत रंगली पार्टी ; ५०० पेक्षा जास्त पर्यटक उपस्थितीत

लोकांना आता भाजप आणि काँग्रेस पक्षांमध्ये रस नाही

लोकांनी सांगितले की त्यांना आता भाजप आणि काँग्रेस पक्षांमध्ये रस नाही. त्यांनी लोकांसाठी काहीही केले नाही आणि केवळ त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या स्वयं-विकासावर लक्ष केंद्रित केले. इतक्या वर्षांनंतर ते आता ‘आप’कडे पाहत आहेत, असं त्यांनी सरतेशेवटी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!