ऑफर आल्यास भाजपच्या तिकिटावर लढू

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेंची स्पष्टोक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजपने ऑफर दिल्यास आगामी विधानसभा निवडणूक आपण भाजपच्या तिकिटावर लढू, असं मंत्री गोविंद गावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि राज्य प्रभारी सी. टी. रवी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचाः मुंबईत सध्या 485 अतिधोकादायक इमारती

ऑफर आल्यास भाजपच्या तिकिटावर लढू

गेल्या चार वर्षांपासून आपण भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्यापासून आजपर्यंत भाजपने आपल्याला पूर्ण साथ दिली आहे. त्यामुळे तेव्हापासून आपली भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा होती. पण आपण अद्याप भाजपमध्ये रितसर प्रवेश केलेला नाही. तरीही भाजपचे केंद्रीय नेते गोव्यात येऊन जेव्हा बैठका घेतात, त्या बैठकांत आपण सहभागी होतो. पक्षाच्या विविध वेबिनारमध्येही आपला सहभाग असतो. अजून आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. पण आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यास भाजपच्या तिकिटावर आपण निवडणूक लढवू, असे मंत्री गावडे म्हणाले.

हेही वाचाः कोरगाव सरपंच स्वाती गवंडी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव

बी. एल. संतोष, सी. टी. रवी यांची गावडेंशी चर्चा

बी. एल. संतोष आणि सी. टी. रवी यांनी गुरुवारी आपल्याशी १५ मिनिटे चर्चा केली. यात आपल्याकडे असलेल्या कला व संस्कृती, नागरी पुरवठा, आदिवासी कल्याण या खात्यांचा त्यांनी आढावा घेतला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!