EXAMS | ICSEची रद्द झाली, गोवा शिक्षण मंडळ कसली वाट पाहतंय?

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 10वीची परीक्षा रद्द

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशातील कोरोना वायरसचा वाढता विळखा पाहता आता CBSC पाठोपाठ ICSE बोर्डाने देखील त्यांच्या 10वी,12वीच्या परीक्षांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार देशभरात 4 मे पासून सुरू होणारी यंदाची त्यांची 10 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर 12 वी ची परीक्षा अद्यापही स्थगित आहे. पुढील काही दिवसांनी 12वी च्या ऑफलाईन परिक्षेबाबत आणि त्यांच्या तारखांबाबत निर्णय घेतला जाईल असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Exams | Video | परीक्षा रद्द करा, अन्यथा ऑनलाईन परीक्षा घ्या!

विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता महत्त्वाची

CISCE ने परिपत्रक जारी करताना, विद्यार्थी आणि शिक्षक यांचं आरोग्य आणि सुरक्षितता हे आमचं प्राधान्य असल्यानं यंदा कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता आम्ही 10 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत. दहावीच्या सार्‍या विद्यार्थ्यांना आता objective criterion म्हणजेच अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनेच वर्गोन्नती दिली जाणार आहे. यंदा 11 वीचे वर्ग देखील ऑनलाईन माध्यमातून सुरू करण्याचे निर्देश परिपत्रकामध्ये देण्यात आले आहेत.

12वीच्या परीक्षेचा अद्याप निर्णय नाही

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप परीक्षेचा निर्णय झालेला नाही. 16 एप्रिलच्या परिपत्रकानुसारच सध्या निर्णय ठेवण्याचे निर्देश आहेत. म्हणजेच सध्या ही परीक्षा स्थगित आहे. बोर्डातून 12 च्या ऑफलाईन परीक्षा या लवकरच घेतल्या जाणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना परिस्थिती पाहून त्याबाबतचा निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचाः आंदोलक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

गोवा शिक्षण मंडळ कसली वाट पाहतंय?

CBSC पाठोपाठ ICSE बोर्डानेदेखील त्यांची 10वीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिलंय. ICSE ने घेतलेल्या या निर्णयाचं विद्यार्थी तसंच पालकांनी स्वागत केलंय. या निर्णयानंतर राज्यातून मात्र गोवा शिक्षण मंडळांवर टीकची झोड उठलीये. गोवा शिक्षण मंडळ अजून कसली वाट पाहतंय, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी विचारतायत. विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा की बोर्डाच्या परीक्षा, असा सावलही उपस्थित केला जातोय. CBSC आणि  ICSE पाठोपाठ आता गोवा शिक्षण मंडळ बोर्डाच्या परीक्षांबाबत आपला निर्णय बदलतं, की घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!