तेव्हाच मृतदेह प्रत्यक्ष पाहिला असता तर…

मयत सिद्धीच्या वडिलांची खंत; सोशल मीडियावर फोटो पाहून दाखल केली तक्रार

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: नास्नोळा येथील सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाला आता २० दिवसांनी वेगळीच कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला आपल्याला हे प्रकरण अजून वाढवायचं नाही, असा पवित्रा मयत सिद्धीच्या वडिलांनी घेतला होता. पण आता आपल्या मुलीचा घातपाताचा संशय व्यक्त करीत त्यांनी कळंगुट पोलिसांत अज्ञाताविरुद्ध लिखित तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचाः न्यायालयीन प्रक्रियेत अडकली ईव्हीएम यंत्रे!

मयत युवतीचे वडील संदीप नाईक यांनी ही तक्रार गुदरली आहे. गुरुवारी सामाजिक कार्यकर्ता आवडा व्हिएगस यांच्या उपस्थितीत नाईक यांनी पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्याकडे ही तक्रार सुपूर्द केली.

12 ऑगस्ट रोजी विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

कळंगुट समुद्रकिनारी १९ वर्षीय मयत सिद्धी विवस्त्र अवस्थेत मृत्युमुखी पडलेली १२ ऑगस्ट रोजी सकाळी आढळली होती. तर ११ ऑगस्ट रोजी कामावर जाण्यासाठी घरातून निघाली असता ती गिरी येथील ग्रीनपार्क जंक्शनवरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी म्हापसा पोलिसांत दाखल केली होती.

हेही वाचाः मतभेदांमुळे पक्ष रसातळाला जाणार नाही, याची काळजी घ्या

पाण्यात बुडून मरेपर्यंत तिला मारलं असावं

फिर्यादी संदीप नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला माझ्या मुलीच्या मृत्यूमागे घातपात नसल्याचं मला वाटत होतं. पण आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली छायाचित्रे आणि शवचिकित्सा अहवाल वाचल्यानंतर सिद्धीची हत्या झाली आहे, असं मला वाटतं. अज्ञात व्यक्तीने सिद्धीला जबरदस्तीने उथळ समुद्रकिनार्‍याच्या पाण्यात तोंड आणि नाकपुड्या बंद होतील, अशा स्थितीत ती पाण्यात बुडून मरेपर्यंत तिला मारलं असावं, त्यामुळे यात घातपात असल्याचं या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः आतापर्यंत दोन्ही डोस घेतलेल्या ११ जणांचा कोविडमुळे मृत्यू!

शवविच्छेदन अहवालानुसार सिद्धीच्या शरीरावर तीन मोठ्या जखमा

शवविच्छेदन अहवालानुसार सिद्धीच्या शरीरावर तीन मोठ्या जखमा होत्या. त्या मृत्यूपूर्वीच्या होत्या. तसंच सिद्धीच्या पायांवर दोन तर इतर ठिकाणी एक जखम आढळली होती. एकूण तीन जखमा. या तिन्ही जखमा या मृत्यूपूर्वीच्या होत्या. तसंच सिद्धीच्या पोटात पाणी मिळालं नव्हतं. पण वाळूचे कण तिच्या स्वरतंतूच्या पार आढळले, असं शवविच्छेदन अहवाल सांगतो. हा शवचिकित्सा अहवाल आपल्याला १ सप्टेंबर रोजी मिळाला, असं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.

तर त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला असता

घटनेच्या दिवशी सिद्धीचं हे व्हायरल छायाचित्रं बघितलं नव्हतं किंवा आपण घटनास्थळी प्रत्यक्षात मृतदेह पाहिला नव्हता. जर आपण घटनास्थळी मृतदेह पाहिला असता तर त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त करीत तक्रार दिली असती. आपण ही छायाचित्रे पाहिली नव्हती, त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला नव्हता, असंही त्यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचाः अदानींनंतर आता अंबानींचा धमाका; ‘ही’ कंपनी रिलायन्सच्या ताब्यात

ज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा

सिद्धीच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्या अंगावर काही जखमा होत्या, असं समजलं. तसंच अहवालातील काही त्रुटी लक्षात घेत, मी हे प्रकरण घातपाताचं असल्याचं सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कळंगुट पोलिसांकडे केली आहे, असं मयत सिद्धीचे वडील संदीप नाईक म्हणाले.

हेही वाचाः गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादीची युतीबाबत काँग्रेसला डेडलाईन!

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास हा खुनाच्या दृष्टिकोनातून व्हावा

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास हा खुनाच्या दृष्टिकोनातून व्हावा, अशी आमची मागणी आहे. त्यानुसार, तिच्या वडिलांमार्फत नवीन तक्रार कळंगुट पोलीसस्थानकात दाखल केली आहे. सिद्धीच्या शवविच्छेदन अहवालातही काही त्रुटी असून आम्ही त्या पोलिसांच्या निदर्शनास आणल्या आहेत, असं ‘बायलांचो एकवट’चे अध्यक्ष अ‍ॅड. आवडा व्हिएगस म्हणालेत.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!