डिसोझांना टीटोज न विकण्याची विनंती करेन

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: रिकार्डो डिसोझा यांना टीटोजची विक्री करू नये म्हणून आग्रह धरणार असल्याचं कळंगुटचे आमदार मायकल लोबोंनी मंगळवारी सांगितलं. मी माझा मित्र रिकार्डोला टीटोची विक्री करू नये म्हणून उद्युक्त करेन. हा गोमंतकीयांचा ‘ब्रँड’ आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून मला सांगत होता, की क्लब विकून टाकणार आहे. पण आता मला वाटतं त्याने हा विचार मनाविरुद्ध केला आहे.
हेही वाचाः अवघ्या 100 रुपयांसाठी माजी कुलगुरूंची हत्या !
डिसोझांना त्रास देणाऱ्यावर कारवाई करेन
डिसोझाने त्याला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची मला नावं दिल्यास मी त्या अधिकार्यांवर कडक कारवाई करेन. तो सुमारे 30 ते 40 टक्के हिस्सा विकू शकतो आणि उरलेला भाग आपल्याकडे ठेवू शकतो. तो माझा प्रिय मित्र आहे आणि मी त्याच्याशी बोलेन, असं लोबो म्हणाले.
हेही वाचाः मतदारांच्या गरजा ओळखून विकास करतो तोच खरा आमदार
1971 मध्ये टीटोजची स्थापना
गोवाच्या ‘आयकॉनिक’ पार्टी आणि ‘नाईटलाइफ हँगआऊट’ क्लब टीटोजच्या स्थानिक प्रवर्तकांनी राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या कथित छळामुळे राज्यात क्लब आणि त्यासंबंधित व्यवसायांची विक्री केली. कळंगूट येथे असलेल्या टीटोजची ‘नाईटलाइफ’ आणि पार्टी ‘हँगआऊट’ म्हणून गेली 40 वर्षं ओळख आहे. क्लबच्या अधिकृत वेबसाइटनुसार 1971 मध्ये त्याची स्थापना झाली तेव्हापासून या क्लबने, 87,600 तासांपेक्षा जास्त पार्ट्यांचं आयोजन केलंय. 16,425 पार्टी आयोजित केल्या आहेत आणि दरमहा सरासरी 90 हजार पर्यटक या क्लबला भेट देत असतात.