विकासकामांमुळे मी निवडून येईन

निळकंठ हळर्णकर ; घरोघरी संपर्क मोहीम राबवली

Goan Varta Live | प्रतिनिधी

थीवी : गेल्या पाच वर्षांत मी माझ्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मी निवडून येईन. लोक मला पर्यायाने भाजपाच्या विकासाला मत देतील, असे प्रतिपादन निळकंठ हळर्णकर यांनी केले.
हेही वाचाःकाँग्रेस भ्रष्टाचारमुक्त आणि मजबूत, स्थिर सरकार देईल

घरोघरी राबवली संपर्क मोहीम

थीवी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हळर्णकर यांनी देसाईवाडा – पिर्णा येथे प्रभाग क्रमांक ४, ५ आणि ६ मध्ये घरोघरी संपर्क मोहीम राबवली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे मंडळ अध्यक्ष विश्र्वनाथ खलप, बूथ नंबर २१ चे अध्यक्ष राजेश देसाई, बूथ नंबर २० चे अध्यक्ष सुभाष देसाई, शक्ती प्रमुख पुरुषोत्तम नाईक, सरपंच सुलन परब, पंच मिता नाईक, पंच संदेश देसाई आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचाःट्रक झोपडीवर उलटल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू

विविध विकासकामे मी पूर्ण केली!

मतदारसंघात मला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे हळर्णकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मी गेल्या २००७ ते २०१२ आणि २०१७ ते आत्तापर्यंत वीज, पाणी, रस्ते या मूलभूत विकासासह मोठे प्रकल्प उभे केले. अस्नोडा बसस्थानक, बाजार संकुल, सभागृह, कोलवाळ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ६ पाण्याच्या टाक्या, आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट दिवे, नादोडा येथील माऊली मंदिर परिसराचे सुशोभीकरण, जुवे येथे संरक्षक भिंत, आस्नोडा येथे क्रीडा मैदान आदी कामे मी पूर्ण केली असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचाःमतदानाद्वारे पणजीवासीय योग्य तो निर्णय घेतील

3 गावांच्या मध्यभागी कला भवन उभारण्याचा संकल्प!

भविष्य काळात पिर्ण, रेवोडा, नादोडा आणि कामुर्ली येथे क्रीडा मैदान उभारण्याचे नियोजन आहे. तसेच थीवि, सिरसई आणि आस्नोडा या गावांच्या मध्यभागी कला भवन उभारण्याचा संकल्प आहे. तसेच व्यायामशाळा, सामाजिक सभागृह, पंचायत सभागृह अशी अनेक विकासकामे करण्याचे योजिले असल्याचे हळर्णकर यांनी सांगितले.
हेही वाचाःकंटेनर उलटून दुचाकीला धडकल्याने एक ठार

विकासकामांमुळे लोक मला भरघोस मतांनी निवडून देतील!

घरोघरी संपर्क मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात मी केलेल्या विकासकामांमुळे लोक मला भरघोस मतांनी निवडून देतील, असा विश्वास निळकंठ हळर्णकर यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचाःफूट पाडण्यासाठी भाजपकडून धर्माचा दुरुपयोग

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!