पेडणेकरांच्या सेवेसाठी मी नेहमीच पुढे असेन

प्रवीण आर्लेकरांची ग्वाही; होम कॉरंटाईन कुंटुंबांना मगोतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा वाटप

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: पेडणे मतदारसंघात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. होम कॉरंटाईन असलेल्या कुटुंबांना घराबाहेर पडण्याची मुभा नसल्याने जीवनावश्यक वस्तू  दुकानावरून आणणं त्यांना शक्य होत नाही. अशा घरांना मदत करायला सहजा आजूबाजूचे लोक जात नाहीत. मात्र त्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी पेडणे मगो पक्षातर्फे शुक्रवारपासून कडधान्य तसंच इतर आवश्यक वस्तू देण्याच्या उपक्रम पेडणे मतदारसंघात मगोप नेते प्रवीण आर्लेकरांनी सुरू केला असल्याची माहिती पेडण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

हेही वाचाः न्हंयबाग येथे ओमनी कार नदीत बुडाली

मान्यवरांच्या उपस्थितीत घोषणा  

पेडणे मतदारसंघातील  होम कॉरंटाइन असलेल्या घरांना तसंच गरजूंना कडधान्य देण्याच्या उपक्रम जाहीर करताना मगोप नेते प्रवीण आर्लेकरांसोबत पक्ष प्रवक्ते उमेश तळवणेकर, उपसरपंच  सुबोध महाले, महेश परब, निलिमा खडपकर, तोरसे पंच दीपक तांबोस्कर, कासारवरणे माजी सरपंच आत्माराम केणी, धोंडू हरीजन उपस्थित होते.

हेही वाचाः विवाहपूर्व काऊन्सिलिंगचा प्रस्ताव सरकारनं गुंडाळला

पेडणे मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आर्लेकरांनी घेतला पुढाकार

माजी मुख्यमंत्री आणि गोव्याचे भाग्यविधाते  भाऊसाहेब बांदोडकर  गरीबांना न्याय मिळावा, त्यांना  मदत मिळावी यासाठी झटले.  त्यांचं हे  स्वप्न  पुढे घेऊन जाण्याचं काम पेडणे मतदारसंघात प्रवीण आर्लेकर करत आहेत. त्यांच्या या कामाला आमच्या शुभेच्या आहेत. कडधान्य तसंच गरजेच्या वस्तू देण्याच्या उपक्रम प्रवीण आर्लेकर यांनी सुरू केला आहे आणि तो यापुढे या मतदारसंघात  कोरोन  असेपर्यंत चालूच राहील. पेडणे मगो पक्षाचा हेल्पलाईन क्रमांक ९३०७१७३८४८ यावर फोन करून या योजनेचा फायदा पेडण्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी  घ्यावा, असं आवाहन उमेश तळवणेकर यांनी केलं.

हेही वाचाः RECRUITMENT | सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये अभियंता पदासाठी भरती

पेडणेकरांच्या सेवेसाठी नेहमीच पुढे असेन

मी आतापर्यंत  पेडण्यातील नागरिकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना स्टीमर दिले.  जे  रुग्ण  आरोग्य केंद्रावर  येतात त्यांना बसण्यासाठी खुर्च्या तसंच मास्क दिले. जे रुग्ण स्टिमर घेऊ शकत नाहीत, ज्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशा रुग्णांना हे स्टिमर देण्यात आले.  यापुढेही पेडण्यातील जनतेसाठी कडधान्य तसंच गरजेच्या वस्तू देण्याच्या उपक्रम मी जाहीर केलाय. त्याचा  लाभ   प्रत्येक गावातील  नागरिकांनी घ्यावा. कोरोना काळात  माणसाने  माणसाची सेवा करावी हा त्या मागचा एकच हेतू आहे. जर कुणाला माझ्याकडून मदत हवी असल्यास त्यांनी मला २९५५९३४  या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन  आर्लेकरांनी केलं.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींची संख्याही घसरली

गरजूंची सेवा ही ईश्वर सेवा

पेडण्यातील गरीब जनतेसाठी प्रवीण आर्लेकर 24 तास आपली सेवा देण्यासाठी  उपलब्ध आहेत. गरजूंची मदत  करणं म्हणजे ईश्वर सेवा  आहे. पेडणे मतदारसंघातील लोकांनी यात राजकारण न आणता या योजनेचा फायदा करून घेतला पाहिजे. प्रवीण आर्लेकरांनी कोरोना काळात गरज ओळखून केलेली सेवा ही खूप चांगली सेवा आहे.  यात  राजकारण नाही, असेही सुबोध महाले म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!