राजधानी पणजीत चक्रीवादळाचा कहर

झाडं कोसळल्यानं रस्ता ब्लॉक, वाहनांचं मोठं नुकसान ; वीज पुरवठ्यात व्यत्यय !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्याची राजधानी पणजीत वादळाचा कहर सुरू आहे. तुफानी वाऱ्यांमुळं झाडं कोसळताहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.
मुख्य मार्गावर कला अकादमीसमोर तसंच आयनॉक्ससमोर झाड कोसळल्यानं वाहतूक ठप्प आहे. त्यामुळं यामार्गावरची वाहतूक आता मार्केटमार्गे वळवण्यात आलीय. दरम्यान, तुफान वारा आणि झाडे कोसळल्यामुळं वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!