शिकाऱ्यांचीच केली शिकार ! दोडामार्गच्या सिंघम लेडी नदाफ यांची चमकदार कामगिरी

जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी महाराष्ट्रात घुसखोरी करणाऱ्या मडगाव इथल्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस ठाण्याची पीआय म्हणून सूत्रे हातात घेतल्यानंतर सिंघम लेडी पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी एक एक धडक कारवाई सुरू केली आहे. बुधवारी त्यांनी शिकारीला निघालेल्या शिकाऱ्यांचीच शिकार केलीय. सासोली मंदार हॉलनजीक तिटयाजवळ कोरोना विषाणू प्रतिबंध आदेशाची पायमल्ली करून गोवा ते दोडामार्ग असा प्रवास करत विनापरवाना बंदुक जवळ बाळगून जंगली प्राण्यांच्या अवैध शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या गोवा मडगाव येथील पाच जणांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या आहेत.

ही धाडसी कारवाई पहाटे 3 च्या सुमारास करण्यात आली. यात निलेश सदानंद वेर्णेकर, वय-३२, आयवन कार्म कुलासो, वय – ४२, जॉनी मिलि कुलासो, वय- ३२ तिन्ही राहणार मडगाव, राया साउथ गोवा यांसह विशाल व सनी (आरोपी चार व पाच राहणार मडगाव) यांच्यावर शस्त्र अधिनियम कलम -3(1),25,27 भादवि 34,188,269,270, 271साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3 व 4
नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रिजवना नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली भरत जाधव व सहकारी यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!