देऊळवाडा कोरगाव येथील कमलेश्वर हायस्कूलचा निकाल शंभर टक्के

१० विद्यार्थी डिस्टिक्शन, १० विद्यार्थी फर्स्ट क्लास, तर ९ विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये उत्तीर्ण

मकबूल | प्रतिनिधी

कोरगावः देऊळवाडा कोरगाव येथील कमलेश्वर हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेला एकूण २९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १० विद्यार्थी डिस्टिक्शन, १० विद्यार्थी फर्स्ट क्लास, तर ९ विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये उत्तीर्ण झालेत.

हेही वाचाः बारावीचा निकाल 18 जुलैला? पालक विद्यार्थी संभ्रमात

पहिले 3 क्रमांक प्राप्त करण्याचा मान मुलींना

कुमारी माधवी महेश गावडे हिने ९४.८३ टक्के गुण प्राप्त करत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर कुमारी लविना हेमंत देसाई ९०.६६ गुण मिळवत दुसरी आली आहे. कुमारी समीक्षा संजय गणपुले हिने ९०.३३ गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विशेष यश मिळवलेल्या या विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापक भालचंद्र हिरोजी, शिक्षक वर्ग, संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे.

9 वर्षांपासून 100 टक्के निकालाची परंपरा कायम

गेल्या ९ वर्षांंपासून सलग १०० टक्के निकाल देऊळवाडा कोरगाव येथील कमलेश्वर हायस्कूलची परंपरा राहिली आहे. या विद्यालयातील प्रत्येक शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी खूप मेहनत घेते आहे. सलग ९ वर्षं १०० टक्के निकाय कायम ठेवल्याबद्दल गावतील नागरिकांनी विद्यालयातील शिक्षकांचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | ‘आप’च्या प्रतिमा कुतिन्होंना पोलिसांकडून समन्स

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!