देशासह गोव्यातही रुग्णवाढीचा नवा उच्चांक! गोव्यात 757 तर देशात 2 लाख नवे रुग्ण

राज्यात रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ठरतेय चिंता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : संपूर्ण देशात सुरु असणारा कोरोनाचा कहर सुरु आहे. राज्यातही तेच पाहायला मिळतंय. गुरुवारी म्हणजेच 15 एप्रिल रोजी राज्यात विक्रमी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा भयंकर वेग आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढवतोय. राज्यात गुरुवारी 757 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा हा आता 5 हजार 682 वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा हा 862वर पोहोचला आहे.

corona update
corona update

हेही वाचा – कोरोनाचं थैमान! राज्यात 24 तासांत 5 जणांचा बळी

राज्याचा रिकव्हरी रेट आता 90 टक्क्यांच्या आत आला आहे. 89.87 टक्के रुग्ण इतक्या खाली राज्याचा रिकव्हरी रेट आला आहे. गेल्या 24 तासांत 182 रुग्ण बरे झालेत. 367 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत, तर 97 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचा मृत्यूदही चिंतेचा विषय ठरु लागलाय.. काल 4 रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 8 दिवसांत 22 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा – ‘कोरोनामुळे होणारे मृत्यू कुणीच रोखू शकत नाही, जो म्हातारा झालाय, तो तर मरणारच आहे’

सर्वाधिक रुग्ण दक्षिण गोव्यातील मडगावमध्ये आहेच. मडगावात 660 रुग्ण आहेत, तर उत्तर गोव्यातील पर्वरीत 558 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पणजीतील सक्रिय रुग्णसंख्या 400च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पणजीत सध्या 398 रुग्ण आहेत. तर फोंड्यात 380 रुग्ण आहेत. महत्त्वाचं म्हणजे शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोनाचा धोका वाढतोय.

हेही वाचा – FACT CHECK : पाँडिचेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यानं शोधला कोरोनावर जालिम उपाय?

कुठे किती सक्रिय रुग्ण? (उत्तर गोवा)

डिचोली
काल 110 आज 134

साखळी
काल 115 आज124

पेडणे
काल 114 आज134

वाळपई
काल 52 आज60

म्हापसा
काल 341 आज401

पणजी
काल 322 आज398

हळदोणा
काल 93 आज 116

बेतकी
काल 46 आज 52

कांदोळी
काल 344 आज 321

कासारवर्णे
काल 11 आज 19

कोलवाळ
काल 71 आज 86

खोर्ली
काल 118 आज 137

चिंबल
काल 180 आज 204

शिवोली
काल 162 आज 164

पर्वरी
काल 484 आज 558

मये
काल 33 आज 32

पाहा व्हिडीओ –

कुठे किती सक्रिय रुग्ण? (दक्षिण गोवा)

कुडचडे
काल 67 आज 94

काणकोण
काल 85 आज 98

मडगाव
काल 591 आज 660

वास्को
काल 239 आज 271

बाळ्ळी
काल 44 आज 54

कासावली
काल 152 आज 174

चिंचिणी
काल 99 आज 110

कुठ्ठाळी
काल 265 आज 284

कुडतरी
काल 87 आज 89

लोटली
काल 71 आज 89

मडकई
काल 42 आज 46

केपे
काल 34 आज 36

सांगे
काल 93 आज 87

शिरोडा
काल 82 आज 102

धारबांदोडा
काल 60 आज 58

फोंडा
काल 387 आज 380

नावेली
काल 93 आज 89

रस्ते, विमान आणि रेल्वेनं प्रवास करणाऱ्यासाठी आढळून आलेले – 21

हेही वाचा – 12च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! कोरोनाबाधित रुग्णही परीक्षा देऊ शकणार, शिवाय…

देशभरात तब्बल 2 लाखापेक्षा नवे रुग्ण

देशभरात नव्यानं 2 लाख 739 कोरोना रुग्णांची भर अवघ्या 24 तासांत पडल्याची नोंद गुरुवारी करण्यात आली. हा एक नवा रेकॉर्ड आहे. 2021मधील रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे. आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशभरात तब्बल 1 हजार 38 रुग्ण दगावलेत. सलग 9 दिवस 1 लाखापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले होते. तर 11 दिवसांत रुग्ण दुप्पट झाल्याचं अधोरेखित झालं असून 1 लाखावरुन आता 2 लाख रुग्ण देशात आढळून येत आहेत. दिवसाला 2 लाख रुग्ण आढळून येत असल्यानं देशात कोरोनाची दुसरी लाट वेगानं पसरत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!