काँग्रेसच्या सोशल मीडिया ट्रेंडला देशभर प्रचंड प्रतिसाद

अवघ्या एका तासात 'भाजपच्या लुटीविरूद्ध भारत' हा ट्रेंड देशभरात क्रमांक एकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः काँग्रेसने आज सुरू केलेल्या सोशल मीडियावरील नव्या मोहिमेला सर्व स्तरातून लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. अवघ्या एका तासात ‘भाजपच्या लुटीविरूद्ध भारत’ हा ट्रेंड देशभरात क्रमांक एकवर राहिला. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत या ट्रेंडला एक लाखाहून अधिक ट्विट मिळाले.

हजारो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड

देशभरातील जनतेने सरकारविरूद्ध संताप व्यक्त करणारे हजारो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले. सत्तापिपासू आणि भांडवालदार धार्जिण्या सरकार विरोधात आवाज बुलंद करत लोकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

२०२१ पासून गॅस दरवाढ

जानेवारी २०२१ पासून मोदी सरकार गॅस दरवाढ करीत आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रत्येक गॅस सिलिंडरमागे १९० रुपयांनी दरवाढ केली असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

गेल्या आठ महिन्यात ६७ वेळा इंधन दरवाढ

गेल्या आठ महिन्यात ६७ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. खाद्यतेलांच्या किंमती ५० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे गरीब जनता आणि मध्यमवर्गीयांना जीवन जगणं कठीण झालं आहे.

सरकार हा सर्व पैसा कुठे नेतंय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या विषयावर पत्रकार परिषद घेऊन जनतेवर ही प्रचंड भाववाढ लादून सरकार हा सर्व पैसा कुठे नेत आहे, असे अनेक प्रश्न केले आहेत.

गोवा प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष हिमांशू तिवरेकर यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं आहे की, देशातील अनेक उद्योग आपल्या सुटाबुटातील मित्रांना विकत असलेल्या या सरकार विरूद्ध तसंच भाजपच्या लुटी विरोधात जनतेने एकत्र येऊन आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे.

हा व्हि़डिओ पहाः Crime | किरकोळ घरगुती वाद चिघळून थेट जीवघेणा हल्ला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!