आता 18 वर्षांवरील कोरोना रूग्णांवर ‘प्रॉफिलेक्सिस ट्रीटमेंट’

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविडची साथ तातडीनं आटोक्यात आणण्यासाठी आता ‘प्रॉफिलेक्सिस ट्रीटमेंट’ चा वापर केला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलीय.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यानं गोवा सरकार 18 वर्षांवरील रुग्णांना ही ट्रीटमेंट देणार आहे. ही ट्रीटमेंट त्वरित अंमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात इव्हर्मेक्टिन हे औषध 12 mg इतक्या प्रमाणात 5 दिवस देण्यात येतं. युके, इटली, स्पेन आणि जपान इथल्या तज्ज्ञांनी या उपचारपद्धतीमुळं रुग्णाचे मृत्यू आणि बरे होण्याचा मोठा कालावधी घटल्याचं सांगितलंय. संसर्गाचा धोकाही कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, अगदीच गाफील न राहता प्रत्येकानं काळजी घ्यावी. कोविडसंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. या टॅब्लेट्स जिल्हा, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरएमडी, तसेच जीएमसी इथं उपलब्ध करण्यात येत आहेत, असंही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!