दिगंबर कामत यांचा सिंधुदुर्ग भाजपनं केला निषेध

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शेजारधर्माचं काँग्रेसकडून राजकारण

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गला ऑक्सिजन दिल्याबद्दल गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना या विषयावरून लक्ष्य करणारे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जाहीर निषेध केला आहे.

ते म्हणाले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडं शत्रूराष्ट्रंही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. दुसरीकडं आपल्या शेजारील राज्याचे माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप करताहेत. आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत. किंबहुना सिंधुदुर्ग हा गोव्याचाच भाग असल्यासारखे वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने नारायण राणे यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी विनंती केली. खरंतर गोव्यातही मुबलक सिलिंडर आहेत असा भाग नाही, परंतु डॉ. प्रमोद सावंत यांनी शेजारधर्माच्या नात्याने, तातडीची गरज म्हणून काही सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था केली. या गोष्टीचे गोवा काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!