भरधाव कारनं पादचाऱ्याला उडवलं

कुडाळ - पिंगुळी गुढीपूर इथले श्रीधर कडूलकर जागीच ठार

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. यात पादचारी श्रीधर विष्णू कडूलकर (६०) हे जागीच ठार झाले. हा अपघात सायंकाळी उशिरा ७.४५ वा. च्या दरम्यान झाला.
कार चालक शमशुद्दीन ढोले बांदा येथे टॉवरच्या कामाकरिता अभियंता व अन्य एकजण असे गेले होते. ते पुन्हा कुडाळ मार्गे बांदा ते कोल्हापूर असे जात होते. ते गुढीपूर येथे आले असता भरधाव कारची जोरदार धडक पादचारी श्रीधर कडूलकर यांना बसली. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक संध्या शिंदे, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, एल आर तांबे उपस्थित झाले होते. पंचनामा केल्या नंतर मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला.
श्रीधर कडूलकर हे आपला पुतण्या शैलेश कडूलकर यांच्या दुकानात मदत करत असत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!