आता भाजप आमदारांची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध

भाजप गोवा प्रदेश माध्यम विभाग संयोजक संदेश साधले यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भाजपचे राज्यभरातील आमदार कोविड रुग्णांना इस्पितळात नेण्यासाठी जनतेला रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याची माहिती भाजप गोवा प्रदेश माध्यम विभाग संयोजक संदेश साधले यांनी दिलीय.
चाचणीनंतर एखाद्याला कोविडची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांनाही ही रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस (संघटन) श्री. सतीश धोंड यांनी सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी कोविड रुग्णवाहिकेची सेवा तत्काळ उपलब्ध करण्याची सूचना केली आहे. एखाद्याला कोविडची लक्षणे दिसल्यास त्याला स्टेप अप इस्पितळात किंवा कोविड निगा केंद्रात दाखल करण्यासाठीही ही रुग्णवाहिका सेवा मिळणार आहे. सांतआंद्रेतील भाजपचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी अशी खास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे.
कोविड लागणीमुळे गृह अलगीकरणात असलेल्या जनतेला अन्न व औषधे पुरवण्याची सुचना भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे. सध्याच्या महामारीच्या काळात जनतेला ताणाला सामोरे जाऊ लागू नये म्हणून भाजप सर्वतोपरी मदत करण्यास पुढे सरसावला आहे. गेल्या वर्षीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळेबंदीच्या काळात घऱातच असलेल्या जनतेपर्यंत मदतीचा हात पोचवला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!