बारावीचा निकाल येत्या दोन दिवसांत होणार जाहीर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या २ दिवसांत जाहीर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं होतं. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगानेच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

हेही वाचाः पुढील काही तास महत्त्वाचे, पावसाचा रेड अलर्ट जारी

निकालाची अधिकृत तारीख लवकरच करणार जाहीर

येत्या दोन दिवसांत राज्यातील बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. गोवा बोर्डाचे अध्यक्ष निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर करतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. यापूर्वी सांगितलेल्या अंतर्गत मूल्यांकन आणि मूल्यमापन निकषाच्या आधारे गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

हेही वाचाः बंदिरवाडा – डिचोलीत मगरीची सुखरूप सुटका

‘सीबीएसई’च्या मूल्यमापन पद्धत अनुसरून निकार करणार जाहीर

बारावीचा निकाल तयार करण्यासाठी यंदा गोवा बोर्डाने सीबीएसईची मूल्यमापन पद्धत स्वीकारली आहे. या पद्धतीनुसार – 30:30:40, म्हणजेच 10 वी आणि 11 वीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीसाठी प्रत्येकी 30 टक्के आणि 12 वीमध्ये घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनात 40 टक्के, या आधारावर विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे.

हेही वाचाः १० आमदारांच्या अपात्रता याकिचेवर आता ‘या’ न्यायपीठासमोर सुनावणी

निकालाशी समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी

राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 10वी-12वी च्या परीक्षा रद्द केल्या. तसंत अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. निकाल जाहीर झाल्यानंंतर जे विद्यार्थी निकालाशी तसंच मूल्यांकन धोरणाशी समाधानी नसतील त्यांना परीक्षा देण्यासाठी संधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!