होमलोन योजना! 3 आठवड्यात अतिरीक्त बाजू मांडा, हायकोर्टाची सरकारला मुदत

सरकारी कर्मचारी तसंच इतर संबधितांना अत्यंत माफक व्याज दरांत गृहकर्ज (एचबीए) मिळवून देणारी योजना राज्य सरकारने रद्द केली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सरकारी कर्मचारी तसंच इतर संबधितांना अत्यंत माफक व्याज दरांत गृहकर्ज (एचबीए) मिळवून देणारी योजना राज्य सरकारने रद्द केली आहे. या प्रकरणी राज्य सरकारला अतिरिक्त बाजू मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तीन आठवड्याची मूदत दिली आहे.

हेही वाचाः स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी आमंत्रित करणार

खंडपीठात प्रथम याचिका दाखल

या प्रकरणी नीलेश बी. नाईक आणि इतर २४५ जण, यशोधा तारी आणि इतर ९० जण, शफी गुलाम रसूल जमादार आणि फिलोमेनो कोस्टा आणि इतर २४० जणांनी खंडपीठात प्रथम याचिका दाखल केली होती. त्यानंतर गोवा ज्युडिशियल ऑफिसर असोसिएशनसे याचिका दाखल केली आहे. या पाचही याचिकेत राज्य सरकार, कायदा सचिव, वित्तीय सचिव, बँक ऑफ इंडिया तसंच इतरांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.

हेही वाचाः पेडणेत परप्रांतीयांच्या गर्दीला बाबू आजगावकर जबाबदार !

काय आहे प्रकरण?

राज्य सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चाला कात्री लावण्याच्या उद्देशाने १५ मे २०२० रोजी आदेश जारी करून सरकारी गृहकर्ज योजना रद्दबातल केली. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ २ टक्के व्याजाने गृहकर्जाचा लाभ मिळत होता. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृहकर्ज योजना रद्द केल्यानंतर वित्त खात्याने एक आदेश जारी करून या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना सरकारी व्याजदरातील सूट मागे घेऊन बँकेच्या बाजारभावाप्रमाणे व्याज लागू होईल, असं स्पष्ट केल्याचं याचिकेत म्हटलं आहे. त्यानंतर १२ सप्टेंबर २०२० रोजी गोवा (गृहकर्ज नियमन) अध्यादेश २०२० जारी करून १५ मे २०२० रोजी पासून गृहकर्ज योजना रद्द केली होती. याचिकादारानी या अध्यादेश बाबत याचिकेत दुरूस्ती करून खंडपीठात सादर केली. त्यामुळे मंगळवारी झालेल्या सुनावणी वेळी अँडव्हकेट जनरल देवीदास पांगम यानी अतिरिक्त बाजू मांडण्यासाठी मूदत मागितली. याची दखल घेऊन खंडपीठाने सबंधित मूदतीत वाढ करून तीन आठवड्याचा आत बाजू मांडण्याचा आदेश जारी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | भाजपला घेरण्यासाठी गोवा फॉरवर्ड सक्रिय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!