सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृहकर्ज योजना; सरकारी आदेशाला खंडपीठात आव्हान

अ‍ॅडव्होकेट जनरल यांची तीन महिन्यांच्या मुदतीची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सरकारी कर्मचारी आणि इतर संबंधितांना माफक व्याज दरात गृहकर्ज (एचबीए) मिळवून देणारी योजना राज्य सरकारने रद्द केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह गोवा ज्युडिशियल ऑफिसर असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेऊन आव्हान दिलं आहे. या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने तीन आठवड्यांची मुदत मागितल्यामुळे याचिका पुढे ठेवण्यात आली आहे.

हेही वाचाः विदेशी युवतीची पुन्हा स्थानबद्धता केंद्रात रवानगी

खंडपीठात याचिका दाखल

या प्रकरणी नीलेश बी. नाईक व इतर २४५ जण, यशोदा तारी आणि इतर ९० जण, शफी गुलाम रसूल जमादार आणि फिलोमेनो कोस्टा आणि इतर २४० जणांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर गोवा ज्युडिशियल ऑफिसर असोसिएशनने याचिका दाखल केली आहे. या पाचही याचिकेत राज्य सरकार, कायदा सचिव, वित्तीय सचिव, बँक ऑफ इंडिया आणि इतरांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.

हेही वाचाः भाजपचे संघटन सचिव संतोष आज गोव्यात

१५ मे २०२० पासून गृहकर्ज योजना रद्द केली

राज्य सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चाला कात्री लावण्याच्या उद्देशाने १५ मे २०२० रोजी आदेश जारी करून सरकारी गृहकर्ज योजना रद्दबातल केली. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ २ टक्के व्याजाने गृहकर्जाचा लाभ मिळत होता. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृहकर्ज योजना रद्द केल्यानंतर वित्त खात्याने आदेश जारी करून या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना सरकारी व्याजदरातील सूट मागे घेऊन बँकेच्या बाजारभावाप्रमाणे व्याज लागू होईल, असं स्पष्ट केल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

हेही वाचाः Coronavirus Updates: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा किंचित वाढ

तीन आठवड्यांची मुदत

१२ सप्टेंबर २०२० रोजी गोवा (गृहकर्ज नियमन) अध्यादेश २०२० जारी करून १५ मे २०२० पासून गृहकर्ज योजना रद्द केली होती. याचिकादारानी या अध्यादेशाबाबत याचिकेत दुरुस्ती करून खंडपीठात सादर केली. त्यामुळे सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी अ‍ॅडव्हकेट जनरल देविदास पांगम यानी बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली. याची दखल घेऊन खंडपीठाने मुदतीत वाढ दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!