जमीन हडप प्रकरणातील सूत्रधाराच्या विरोधात त्याच्याच साथीदाराची तक्रार…

विक्रांत शेट्टी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार विक्रांत शेट्टी याने आर्थिक मोबदला देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमीन हडप प्रकरणातील त्याच्या साथीदाराने दिलेल्या तक्रारीवरून एसआयटीने ही कारवाई केली आहे. हा गुन्हा दाखल होताच शेट्टी याने पणजीतील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन धाव घेतली आहे. त्याच्या अर्जावर ११ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
हेही वाचाःनगराध्यक्ष – उपनगराध्यक्ष फेरबदलाचा जोशुआंना अधिकार : तानावडे…

विक्रांत हा जमीन हडप प्रकरणाचा मुख्य सूत्रधार

विक्रांत हा जमीन हडप प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून कायतान फर्नांडिस हा देखील याच प्रकरणातील दुसरा संशयित आहे. विशेष म्हणजे, विक्रांतने फसवणूक केल्याची तक्रार कायतान याने केली आहे. विक्रांत शेट्टी याने १२ एप्रिल २०२२ पूर्वी कौटुंबिक वाद असल्याचा बहाना करून बार्देश तालुक्यातील जमीन फर्नांडिस याच्यासह त्याच्या कुटुंबाच्या नावावर केली. त्यासाठी शेट्टी याने मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर शेट्टी याने ठरल्याप्रमाणे संबंधित जमीन फर्नांडिस आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर केली. तसेच त्यासाठीची रक्कम बँक खात्यात जमा केली.
हेही वाचाःगोवा बाल हक्क संरक्षण आयोगाचा कारभार मंदावला…

एसआयटीकडून विक्रांत शेट्टी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

त्यानंतर संभाव्य ग्राहकांना संबंधित जमीन विकण्यात आली. नंतर शेट्टी याने त्याच्या बँक खात्यातून ती रक्कम काढली. तसेच ठरल्याप्रमाणे मोबदला दिला नाही. त्यामुळे माझी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार जमीन हडप प्रकरणातील दुसरा संशयित कायतान फर्नांडिस याने एसआयटीकडे शनिवार, १ रोजी केली होती. याची दखल घेऊन एसआयटीने विक्रांत शेट्टी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर संशयित शेट्टी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचाःआता करू शकणार नाही ‘गुगल ट्रान्सलेशन’?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!