हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पोहोचले पंतप्रधानांच्या भेटीला

राजेंद्र आर्लेकर-मोदींची भेट; विविध विषयांवर केली चर्चा; राज्यपाल पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच घेतली मोदींची भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः हिमाचल प्रदेशचे नवनिर्वाचित राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी राज्यपाल पदाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीये. हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींंचं मार्गदर्शन घेण्यासाठी आर्लेकरांनी पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचं समजतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी ट्विट करत माहिती दिलीये. या भेटीदरम्यान त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झालीये. पण नक्की कोणत्या विषयांवर त्यांच्यात बोलणं झालंय याविषयी अद्याप काही समजू शकलेलं नाही.

हेही वाचाः तिळारी नदीकाठावर ‘हाय अलर्ट’ ; एनडीआरएफ राबवणार ‘रेस्क्यू ऑपरेशन’

राष्ट्रपतींचीदेखील घेतली भेट

राजेंद्र आर्लेकरांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीदेखील नवी दिल्लीत भेट घेतली. त्यांच्याशीदेखील त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. राज्यपाल पदाचा ताबा घेतल्यानंतर देशातील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन राजेंद्र आर्लेकरांनी त्यांच्याप्रति असलेला आदर एकप्रकारे व्यक्त केला आहे.

13 जुलै रोजी घेतली राज्यपाल पदाची शपथ

हिमाचल प्रदेशचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकरांनी 13 जुलै रोजी शपथ घेतली. सकाळी 10 वाजता शिमला येथील राजभवनातील दरबार सभागृहातील कीर्ती कक्षात हा सोहळा संपन्न झाला. हिमाचल उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आर्लेकरांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री, मंत्री सहकारी, घटनात्मक संस्थांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी मान्यवर यांची उपस्थिती होती.

हेही वाचाः बांदासह अनेक गावं पाण्यात, आंबोलीत दरड कोसळली !

राज्यपालपदी नियुक्त झालेले आर्लेकर तिसरे गोमंतकीय सुपुत्र

राज्यपालपदी नियुक्त झालेले राजेंद्र आर्लेकर हे तिसरे गोमंतकीय सुपुत्र ठरलेत. यापूर्वी अँथनी लान्सलोट डायस तसंच जनरल सुनीथ फ्रान्सिस रॉड्रिगीस यांची नियुक्ती राज्यपाल पदावर त्यांच्या प्रशासकीय आणि लष्करी सेवेच्या बळावर झाली होती. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेले राजेंद्र आर्लेकर हे पहिले गोव्याचे राज्यपाल ठरलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यानंतर जनसंघ आणि भाजप असा त्यांचा प्रवास राहीलाय. गोव्यात भाजपचं कमळ रूजवण्यात राजेंद्र आर्लेकरांचंच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांच मोठ योगदान आहे. आणीबाणीच्या काळात ते स्वतः आपल्या वडिलांसोबत तुरूंगात होते. अगदी सामान्य लोकांच्या ओळखीची व्यक्ती राज्यपालपदावर पोहचणं ही खरोखरच भाग्याची गोष्टच ठरलीए.

हा व्हिडिओ पहाः Video | WOMENS ANGRY | तुळस्करवाडीतील महिलांचा घणाघाती आरोप

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!