तौक्ती चक्रीवादळ गोव्याच्या दिशेने, जहाजांना महत्त्वाचे निर्देश

किनारी भागांना फटका बसण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मध्यरात्री अरबी समुद्रावर टाक्टी नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून शनिवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास ते ताशी 70 ते 80 किलोमीटरच्या वेगानं घोंगावत लक्षद्वीप बेटांजवळून उत्तरेकडे निघालं. हे वादळ कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यांलगतच्या समुद्रावरून गुजरातच्या दिशेनं जाणार आहे. तत्पूर्वी या चक्रीवादळाचा फटका गोव्यातील किनारी भागांना बसण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्यानं गोवा सरकारला सतर्क केलंय.

विविध ठिकाणी नांगरून ठेवण्यात आलेली मोठी जहाजं तातडीने किनाऱ्यांवरून समुद्रात नांगरून ठेवण्याचे आदेश दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. ही जहाजे किनाऱ्यांवर राहिल्यास ती वादळीवाऱ्याने किनाऱ्यांसाठी धोक्याची ठरू शकतात तसेच ती किनाऱ्यांचे नुकसान करू शकतात.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ सतर्क बनलीय. गोव्यातही ही टीम सज्ज झालीए. किनारी भागांवर या टीमचे लक्ष असून तेथील आपत्कालीन यंत्रणेला सतर्क बनवण्यात आलंय. 18 तारखेला ते गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचेल असा अंदाज असून आज दुपारपासून 17 तारखेपर्यंत टाक्टी वादळाचा प्रवास महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रातून होईल.

सर्व पोर्ट सतर्क

टाक्टी चक्रीवादळाच्या अनुषंगाने या वादळाचा तडाखा बसू शकणाऱ्या सर्व पोर्टना सतर्क करण्यात आलंय. गोवा मुरगांव पोर्टलाही हवामान खात्यानं इशारा दिलाय. वादळाच्या अनुषंगाने घ्यावयायची सर्व खबरदारी घेण्याचे त्यांना सुचित केलंय.

LIVE – कुठे पोहोचलं वादळ?

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या आणि परवा या वादळाच्या प्रभावानं पाऊस पडेल मात्र या काळात वादळ महाराष्ट्राच्या किनार्यावपासून दूर जाणार असल्यानं पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील. आगामी 3 दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्यानं मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या केरळमध्ये काही भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. कालडी आणि इतर काही गावांमधल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!