अहो, ऐकलंत का, पुरुषांनीही साजरी केली वटपौर्णिमा !

सिंधुदुर्गातल्या कुडाळ इथं तब्बल बारा वर्षांपासून सुरू आहे परंपरा

उत्तम शिरोडकर | प्रतिनिधी

कुडाळ : प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणा-या अर्धांगिणीलाही दीर्घायुष्य दे, असं वडदेवाला मागणं घालत, पुरूषांनीही आज वटपौर्णिमा साजरी केली. थोडीथोडकी नव्हे, तर अतिशय प्रबोधनात्मक अशी ही परंपरा सिंधुदुर्ग जिल्हयातल्या कुडाळ इथं गेल्या बारा वर्षांपासून राबवली जातेय.

जुन्या चालीरीती, प्रथा-परंपरा याबाबत नव्या पिढीत आणि अत्याधुनिक राहणीमानात नकारात्मकता असते. मात्र केवळ नाकारण्यापेक्षा तीच्यातुन काहीतरी चांगला संदेश देण्याचा अतिशय कौतुकास्पद प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातुन होतोय. याच हेतुनं सिंधुदुर्ग जिल्हयातल्या कुडाळ इथं पुरूष मंडळी वटपौर्णिमा साजरी करतात. कुडाळ इथल्या गवळदेव इथं विधीवत पुजा करून वडदेवाला गा-हाणंही घालण्यात येतं. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणा-या सहचारीणीला चांगलं आयुरारोग्य लाभू दे, यासाठी पुरूषमंडळी प्रार्थना करतात.

कुडाळची बॅरिस्टर नाथ पै संस्था, डाॅक्टर व नागरिक पुरुषांनी हा वटपौर्णिमा सण साजरा केला. 2009 पासून या उपक्रमाची सुरुवात झाली. एक तप हि परंपरा चालू आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आणि डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. आज प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, सिद्धेश गाळवणकर, प्रसाद कानडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, सुनिल गोसावी, किरण सावंत, सुरेश वरक, योगेश पुरोहित, संतोष पडते यांनी या पुजेत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!