अनुराधा परवार यांना यथाशक्ती मदत करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवाचं आवाहन; मुसळधार पावसात परवार यांचं राहतं घर जमिनदोस्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः मागचे 5 दिवस राज्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाने अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. या पावसात झाडांची पडझड तर झालीच, त्याचबरोबर अनेकांवर बेघर होण्याची वेळ आलीये. सत्तरी तालुक्यातील देऊळवाडा पिसुर्ले येथील अनुराधा अंकुश परवार यांचं राहतं घर या मुसळधार पावसात १४ जुलै रोजी जमीनदोस्त झालंय.

हेही वाचाः विरोधकांना घाबरुनच सरकारचे ३ दिवसांचे विधानसभा अधिवेशन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गोवाने दिला मदतीचा हात

ही बातमी समजतात दुसऱ्या दिवशी दुपारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष आयु. सतीश कोरगावकर, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष आयु. सखाराम कोरगावकर, समितीचे कोषाध्यक्ष आयु. अशोक परवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून अनुराधा परवार हिला विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवातर्फे आर्थिक मदत केली. तसंच त्यांचं जमीनदोस्त झालेलं घर दुरुस्त करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची आणि सरकारी मदत मिळवून देणारा असं सांगून तिला धीर दिला आहे.

राहतं घर कोसळल्याने निवाऱ्याचा प्रश्न

अनुराधा अंकुश परवार यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. इयत्ता पाचवीत शिकणारी त्यांची एक मुलगी आहे. घरात कामावणारा पुरुष नसल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. त्यांच्या डोक्यावरचं छप्परच कोसळल्याने त्यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. सध्या त्यांनी शेजारच्या घरी आश्रय घेतला आहे. यावेळी त्यांना मदतीची गरज असून सर्वानी तिला यथाशक्ती मदत करावी, अशी विनंती आयु. सतीश कोरगावकर, आयु. सखाराम कोरगावकर, आणि आयु. अशोक परवार यांनी केली आहे.

हेही वाचाः कंधारमध्ये भारतीय पत्रकाराची हत्या

अशी मदत करू शकता

अनुराधा अंकुश परवार हिला मदत करण्यासाठी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवाचे महासचिव आयु. अशोक खाजनेकर (८६००९१९६३३) यांना संपर्क करता येतो. किंवा बॅंक ऑफ इंडिया, Amisha Ankush Parwar, A/C.No: 103610110005265, IFSC Code: BKID0001036, MICRCode: 403013039 या त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा करून त्यांना सहकार्य करता येतं, असं सांगण्यात आलं आहे.ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!