हेदूसवाडी इब्रामपूर सीमा खुलीच

सरकारने सुरक्षात्मक व्यवस्था करावी

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: इब्रामपूर पेडणे मधील हेदूसवाडी सासोली सीमेवर सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील लोकांना ही सीमा लाभदायी ठरत आहे. मात्र गोव्याला ही सीमा धोकादायक ठरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचाः केंद्राचं नवं पॅकेज : आरोग्यासाठी 50,000 कोटी ; पर्यटनालाही मोठा हातभार !

हेदूसवाडी सीमा खुलीच

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामाना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने राज्यातील सर्व सीमांवर परराज्यातून येणार्‍या लोकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे गोव्यात ये जा करणार्‍या शेजारील राज्यातील लोकांवर प्रतिबंद आला आहे. पण पेडणे तालुक्यातील इब्रामपूर मधील हेदूसवाडी सीमा खुलीच आहे. इब्रामपूर आणि सासोलीला जोडणारी ही सीमा असून या सीमेवर हेदूसवाडी पूल उभारण्यात आलेला आहे.

हेही वाचाः गोवा पोलिसांना आणखी चार ‘स्निफर डॉग’साठी विभागाकडून मान्यता

या मार्गारून वाहनांची ये-जा

सध्या पेडणे तालुक्यातील इतर सर्व सीमांवर सरकारने कडक तपासणी आणि करोना चाचणी व्यवस्था राबविली आहे. परंतु हेदूसवाडी पुलावर अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग तसंच इतर जिल्ह्यातील शेकडो लोक कामधंद्याच्या निमित्ताने या सीमेवरून गोव्यात प्रवेश करत असून दिवसभर वाहनांची मोठी रेलचेल या मार्गारून सुरू आहे.
महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे रूग्ण आढळलेत. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेने हेदूसवाडी सीमेवरदेखील दक्षता बाळगणं गरजेचं असून सरकारने या सीमेवर आवश्यक सुरक्षात्मक उपाय योजना राबवावी, अशी मागणी इब्रामपूरवासीयांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!