पावसाचा रेड अलर्ट वाढवला! उद्याही धुव्वाधार पाऊस बरसण्याचा अंदाज

नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकीकडे राज्यात पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढलाय. अशातच हवामान विभागाकडून नवा इशारा जारी करण्यात आला आहे. राज्यातील पावसाचा जोर सोमवारीही कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्याही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

सोमवारीही पावसाचा रेड अलर्ट

19 जुलैलाही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याती शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनीही सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलंय. त्याचप्रमाणे किनारी भागातील जनतेलाही सतर्क राहण्यच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 19 जुलैनंतर म्हणजे 20 ते 22 जुलैपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे गेल्या संपूर्ण आठवड्याप्रमाणेच आता येणाऱ्या आठवड्यातही पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा : येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजनीमा देणार? वाचा कारण काय?

अजून तरी धोका नाही!

मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याल गेल्या आठवड्यात झोडपून काढलंय. त्यामुळे राज्याच्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, अजूनही कोणत्याही ठिकाणी पुराचा धोका नसला, तरीही खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं जातंय. दरम्यान, राज्यातील सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर धुव्वाधार पावसाने रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झाली आहे. दरम्यान, राज्याच्या दोन्हीही जिल्ह्यांत रविवारी सकाळपासून पावसाचा कमालीचा जोर पाहायला मिळालाय. मुसळधार पावसाचा हा जोर येत्या आठवड्यातही असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा : वायरल झालेल्या बारावीच्या निकालावर मोठा खुलासा, तो निकाल खोटा!

रेड, ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं, अशी सुचना जारी करण्यात येते तेव्हा अलो अलर्ट जारी करतात. दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो.

हेही वाचा : PHOTO STORY | पाऊस संततधार, रस्त्यात खड्डे फार

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!