राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार…

संपूर्ण राज्याला मान्सूनच्या पावसाने झोडपून काढले

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मान्सूनच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्याला झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांतील अंतर्गत व मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ४ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज राज्य हवामान खात्याने वर्तवला आहे. शिवाय या कालावधीत सतर्क राहण्याचा ​इशाराही​ नागरिकांना देण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वाधिक २.२८ इंच पाऊस जुने गोवेत झाला. त्यानंतर पणजीत २.२६, म्हापशात २.२४, पेडणेत २.०८, तर मुरगावात १.०६ इंच पावसाची नोंद झाली. त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरूच राहिली.
हेही वाचा:ठरलं! ‘या’ दिवशी होणार पंचायत निवडणुका…

दोन दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतली

राज्यात दाखल झाल्यापासूनच मान्सूनने प्रत्येक भागांत मुसळधार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी एक दिवस पावसाने उसंत घेतली. त्यानंतर पुन्हा रिपरिप सुरू केली. त्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केला. शिवाय, १ ते ४ जुलै या कालावधीतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत या काळात झाडे पडणे, पूरसदृश्य परिस्थिती तयार होणे, वीज, पाणी पुरवठा खंडित होणे, वेगाने वारे वाहणे आदींसारख्या घटना घडू शकतात. नागरिकांनी आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडावे, अशा सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या मान्सून हंगामात आतापर्यंत ३२.६८ इंच पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत पडलेल्या पावसापेक्षा हा पाऊस सरासरी तीन टक्क्यांनी कमी आहे.
हेही वाचा:मणिपूरमध्ये ५५ जवान ढिगाऱ्याखाली; ८ ठार!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!