डिचोली तालुक्यात मुसळधार चालूच

६५ मी.मी. पावसाची नोंद; घर पडून वीस हजारांची हानी; नद्यांची पातळी वाढलेलीच

विशांत वझे | प्रतिनिधी

डिचोलीः डिचोली तालुक्यात मंगळवारी मुसळधार पाऊस सुरूच असून अनेक ठिकाणी पडझड झाली, तर एक घर पडून सुमारे वीस हजारांचं नुकसान झालं. तालुक्यात ६५ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. नद्यांना पूर आलेला असला, तरी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. मात्र पावसाचा जोर चालूच राहिल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपत्कालीन नियंत्रण कक्ष सजक झालेला असून सर्व पंचायत विभागात लक्ष ठेवण्यात येत आहे. 

अंजुणे धरण भरण्यास किमान 15 दिवस

तिलारी धरण परिसरात ६४.४० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूण पाऊस १५५११.२०मि.मि पडला आहे. नदीची पातळी ३८.६५ मीटर असून धोका पातळी ४१.६०मीटर आहे. पाण्याचा विसर्ग नियंत्रित स्वरूपात सुरू आहे. अंजुणे धरण परिसरात ६३ मि. मि. पाऊस झाला, तर एकूण १४१६ मि.मि पाऊस झालाय. धरण पातळी ८१.५४ मीटर असून सध्या तरी धरण भरण्यास किमान १५ दिवस लागतील. डिचोली, वाळवंटी पार घोटेली आदी नद्यांना पूर आला असला, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे असं सांगण्यात आलं. 

साखळी-डिचोली नदीवर पुराचा धोका

साळ येथील शापोरा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. मात्र तूर्त भीती नाही. तिलारी परिसरात धरणाचं पाणी नियंत्रित स्वरूपात सोडलं जात असल्याचं सांगण्यात  आलं. साखळी डिचोली नदीवर पंपिंग सुरू असून पुराचा धोका नाही, असं के.पी.नाईक यांनी सांगितलं. कासारपाल येथील राजेंद्र परवार यांच्या घराची भिंत पडून नुकसान झालंय. अनेक ठिकाणी झाडं पडून नुकसान झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!