Video | मुसळधार पावसाने झोडपलं! सखल भागात पाणीच पाणी, नद्याही दुथडी भरुन

बुधवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज खरा ठरलाय. सोमवारपासून राज्यात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात वेगवेगळ्या भागाला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातही जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे अद्यापतरी जनजीवन विस्कळीत झालेलं नाही, मात्र राज्यातील अनेक सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

नद्या दुथडी भरुन!

मुसळधार पावासमुळे राज्याच्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. म्हादई नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. नदी पाणी पात्रात वाढ झाल्याचंही पाहायला मिळतंय. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार सरींनी म्हादई पुन्हा एकदा प्रवाही झाली आहे. तर दुसरीकडे सत्तरीतील गावांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर सखल भागात असणाऱ्या गावागावातील रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : सत्तरीला पावसाचा पुन्हा एकदा जोरदार तडाखा, घरातही पावसाचं पाणी

ओल्ड गोव्याला तडाखा

इकडे ओल्ड गोवा हायवेवरील रस्त्याच्या निमुळत्या भागाला पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या कडे असलेली वाहनं पाण्यात अडकून पडली आहेत. ओल्ड गोवा हायवेवर एक मारुती ओमनी कार अशाच प्रकारे पाण्यात अडकलीये. दोन दिवसांपूर्ण एक स्विफ्ट कारही अशाच प्रकारे पाण्यात अडकल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसरी ओल्ड गोव्याला पावासाचा तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे ओल्ड गोव्यातील काही रस्त्यांवर गुडघाभर पाणी दिसून आलंय. गुडघाभर पावसाच्या पाण्यातूनच काही जण वाट काढत जात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र गाड्या घेऊन जाणं अशक्य असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला होता, वाहनचालकांची दाणादाण उडाली आहे.

दरम्यान, पाटो पणजीतीलही सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांनी दैना उडाली. यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेकांना कसरत करावी लागतेय. दरम्यान, बुधवारपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांना अधिक सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

हेही वाचा : Video | कणकिरे-गुळेलीला वादळाचा तडाखा, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्यं

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!