आरोग्य कर्मचाऱ्यांनीच ‘धिंगाणा’ केला अन् कोरोना ‘झिंगाट’ झाला !

मुंबई-गोरेगावमधल्या नेस्को कोविड सेंटरचा व्हिडीओ होतोय व्हायरल !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भजन, किर्तनाबरोबरच कोविड केअर सेंटरमध्ये सुरू असणा-या जल्लोषाच्या बातम्याही हल्ली तोंडी लावायला असतात. महाराष्ट्रात आमदार लंके यांचं कोविड सेंटर सध्या याच कारणासाठी चर्चेत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते रोहीत पवार यांचाही जल्लोष सध्या गाजतोय. अशातच आता मुंबई-गोरेगावमधल्या नेस्को कोविड सेंटरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात पीपीई किटमधले आरोग्य कर्मचारीच झिंगाट गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहेत.


कोविड रूग्णांच्या सहवासात सतत वावरत असताना हे कर्मचारी तणावाखाली असतात. त्यांना हा तणाव कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या मनोरंजनाची गरज असते, पण यावेळी जरा वेगळं कारण आहे. गोरेगावच्या या कोविड केअर सेंटरची सुरूवात 2 जुनला गेल्या वर्षी झाली. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य कर्मचा-यांनी अशा प्रकारे पीपीई किटमध्येच जल्लोष करत पहिला वर्धापनदिन साजरा केला. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!