Video | राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी व्यक्त केलं आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यूके आणि यूएस मधील कोरोना स्ट्रेनचं निदान कळण्यासाठी नवं मशिन घेण्याचेही निर्देश देण्यात आल्याचं आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी सांगितलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे आता गोव्यातही या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं निदान करण्याची सुविधा केली जाणार आहे.

हेही वाचा – सोशल डिस्टन्सिंगला अग्निशमन दलाच्या जवानांकडूनच हरताळ! फोटो VIRAL

अधिक ३०० बेड्सची सुविधा दक्षिण गोव्यातील रुग्णालयात देण्यात येणार आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी यंत्रणेवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच बेड्सची सुविधा अपुरी पडत असल्याची कबुलीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. पणजीती काही रुग्णांना दक्षिण गोव्यात शिफ्ट केलं जाणार असल्याचंही त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. आयसीयूचीही संख्या वाढवली जाणार आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – लॉकडाऊनची वेळ आणू नका!

हेही वाचा – राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट!

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

– खुल्या जागेतील बैठकांना दोनशे, सभागृहांतील कार्यक्रमांना शंभर लोकांना परवानगी
– सार्वजनिक ठिकाणी करोना नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
– पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासनाकडून करोनाबाबत जागृती मोहिमा
– उपचार आणि ​विलगीकरणाच्या सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यास प्रारंभ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!