आगामी निवडणूक बाणावली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार

मिकी पाशेको यांची माहिती; युतीची आवश्यकता असणार्‍यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांनी मोठी घोषणा केलीये. आगामी निवडणूक बाणावली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याचं पाशेको यांनी जाहीर केलंय.

हेही वाचाः भयानक! अमेरिकेत ‘इडा’ची पीडा!

…तर काँग्रेस प्रवेश करा

बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करताना त्यांनी एक आवाहन केलंय. ज्यांना ज्यांनी युतीची आवश्यकता आहे असं वाटतंय, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असं पाशेको म्हणालेत. तसंच भाजपसोबत सलगी करणार्‍यांना निवडणुकांआधी स्वार्थासाठी काँग्रेसची आठवण होते, असा टोला त्यांनी फुटीर आमदार तथा मंत्र्यांना लगावलाय.

14 ऑगस्ट रोजी केला काँग्रेस प्रवेश

माजी मंत्री मिकी पाशेको यांनी 14 ऑगस्ट रोजी काँग्रेसमध्ये बिनशर्त प्रवेश केला आहे. दिल्लीत जाऊन गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचं जाहीर केलं होतं.

हेही वाचाः गोवा वेल्हा येथे क्रेन कोसळून दोघा कामगारांचा मृत्यू

द.गो. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दिला होता इशारा

दरम्यान आगामी 2022 च्या विधानसभा निवडणूकीत दक्षिण गोव्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पाशेको म्हणाले होते. मात्र तेव्हा त्यांनी कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे स्पष्ट केलं नव्हतं.

2012-15 या काळात ते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत होते होते. गोवा विकास पक्षाकडून त्यांनी 2012 मध्ये निवडणूक लढवली होती. मिकीवर तब्बल 10 फौजदारी खटले प्रलंबित आहेत. 2002 मध्ये पाशेको त्यांचे गुरू आणि काँग्रेसचे अनुभवी चर्चिल अलेमाओ यांचा पराभव करून प्रथम आमदार झाले. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्यासाठी पाशेको ओळखले जातात. आजपर्यंत युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टी, राष्ट्रवादी आणि अगदी दोन दिवस भाजपशी ते संबंधित होते. 2012 मध्ये त्यांनी जीव्हीपीची स्थापना केली.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!