मध्यरात्री 2 ते पहाटे 6 पर्यंत श्रीपाद नाईकांवर शस्त्रक्रिया

श्रीपाद नाईकांवर मध्यरात्री पार पडली शस्त्रक्रिया

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : श्रीपाद नाईक यांच्यावर जीएमसीमध्ये रात्री उशिरा शस्त्रक्रिया पार पडल्या. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीपाद नाईक यांचा सोमवारी रात्री अपघात झाला होता. अंकोलातील अपघातानंतर त्यांना तातडीनं जीएमसीमध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची डॉक्टरांनी पाहणी केली आणि तातडीनं शस्त्रक्रियाही केल्या.

श्रीपाद नाईक यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. फ्रॅक्चर झाली असल्याची माहिती रात्रीच समोर आली होती. दरम्यान, श्रीपाद नाईक यांच्यावर एकूण चार शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. डॉक्टरांसोबत एक आढावा बैठकही घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आल्यानंतर डॉक्टरांसोबत एक बैठक पार पडणार आहेत. यामध्ये श्रीपाद नाईकांच्या प्रकृतीचा आढावा घेतला जाणार आहे.

श्रीपाद नाईकांच्या पायाच्या फिमर हाडांचं आणि हाताचज्या ह्युमरस हाडाचं ऑपरेशन करण्यात आलं. तसंच कारच्या भीषण अपघातामध्ये त्यांच्या बरगडीलाही जबर मार बसला होता. मध्यरात्री दोन वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत श्रीपाद नाईकांवर शस्त्रक्रिया सुरु होती. दरम्यान, आता सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर जीएमसीमध्येच उपचार सुरु आहेत. जर गरज लागली तर स्पेशलिस्ट डॉक्टरची मदतही घेतली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!