‘तो’ महिलेला अश्लिल व्हिडिओ कॉल्स करायचा…

सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाइन गुन्हे वाढू लागलेत.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः सावधान, सोशल मीडियावर आपण नेमके कसले कमेंट करता, कोणाला शिव्या घालता, कोणाला कसले मेसेज पाठवता वैगरे सर्वांवर सायबर विभागाचं बारीक लक्ष असतं. सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाइन गुन्हे वाढू लागलेत. ओळख लपवून इंटरनेटवर गंभीर गुन्हे सहज करता येतायत. सोशल नेटवर्किंग साईट्‌सच्या माध्यमातून महिलांचे बनावट प्रोफाईल तयार करणं, मॉर्फिंग, अश्‍लील फोटोज वेबसाईट्सवर टाकणं इ. गुन्ह्यांचा तपास करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. यासंबंधीतच सायबर नेट, सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटी असे शब्द आपण सर्रास ऐकतो. पण, याबाबींची तीव्रता आपल्याला माहिती नसतं. नुकताच गोव्यात असाच एक प्रकार उघडकीस आलाय.

नक्की काय घडला प्रकार?

दि. ३० डिसेंबर २०२० रोजी गोव्यातील सायबर गुन्हे पीएस यांच्याकडे एक गुन्ह्याची नोंद झाली. एका पीडित शाळेतील शिक्षिकेकडून तक्रार आली. कोणीतरी तिला अश्लील व्हिडिओ कॉल्स करायचा. एवढंच नव्हे तर तो महिलेशी फोनवर अश्लील गोष्टी बोलण्यास सुरुवात केलेली. तसेच अश्लील फोटोज शेअर करायचा. त्यामुळे ही महिला प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याप्रकरणी महिलेने सायबर गुन्हे पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीआर क्रमांक २४/२०२० ची नोंद केली. तसेच या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू केला.

महिलेने उचलले धाडसी पाऊल…

जेव्हा त्या महिलेले वारंवार असे अश्लील व्हिडिओ कॉल्स येऊ लागले तेव्हा ती तणावाखाली आली. फोन उचलले नाहीत की प्रकार कमी होईल, असं वाटून ती गप्प बसली. पण मग प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता तिने पोलिसात तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. तिने थेट सायबर गुन्हे पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्याकडे रितसर तक्रार केली. या तक्रारीत तिने एक व्यक्ती तिला अश्लील व्हिडिओ कॉल्स करून तिच्याशी अश्लील बोलत असल्याचं सांगितलं. एवढंच नव्हे तर अश्लील फोटोजही पाठवात असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, ज्या व्यक्तीने महिलेला फोन केलेला, ती व्यक्ती तिच्यासाठी अनोळखी असल्याचंही महिलेने पोलिसांच्या लक्षात आणून दिलं. ती महिला त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत नव्हती. त्यामुळे अशाप्रकारे एखाद्या अनोळखी व्यक्तीने थेट एखाद्या महिलेला कॉल करून असा गलिच्छ प्रकार केल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय.

पोलीसांनी तातडीने हलवली यंत्रणा…

जेव्हा महिलेने घडल्या प्रकाराबाबतची माहिती सायबर पोलिसांना दिली, तेव्हा त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. सायबर गुन्हा विभागाचे पीआय विश्वेश कर्पे, पीएसआय सर्वेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ज्या मोबाइल नंबरवरून महिलेला कॉल यायचे, त्याविषयी माहिती मिळविली. आयपी पत्ता आणि इतर बाबी अभ्यासून सखोल तपास केला असता, आरोपी सांगलीहून हा सारा प्रकार करत असल्याचं आढळलं. मिरज-सांगली येथील इब्राहिम खाटीक हा अश्लील फोटोज पाठवायचा, तसंच अश्लील व्हिडिओ कॉल्स करायचा, असं समोर आलं. पोलिसांचं एक पथक ताबडतोब सांगलीला पाठवण्यात आलं. तिथे पोलिसांनी आरोपी अहमदला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!