इतका वेळ का लागतोय? हायकोर्टानं मुंबई-गोवा हायवेच्या कामावरुन केंद्राला सुनावलं

सर्वाधिक वेळ घेत काम केल्याचाही रेकॉर्ड करणार का?

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय मंत्री रेकॉर्डब्रेक वेळेत बांधकाम केल्याचे दाखले देत अनेकदा कंत्राटदारांचं कौतुक करताना पाहायला मिळतात. पण जी कामं दिलेल्या वेळेत होत नाही, त्यांचं काय, यावर मात्र ते बोलल्यानं सध्यातरी दिसून येत नाही. आणि अशातच हायकोर्टानं हाच विषय हाती घेत केंद्राला सवाल केलेत. गोवा महामार्गाचे काम गेली दहा वर्षे रखडले असताना या कालावधीत केंद्र सरकारने काय केले? असा प्रश्न करत हायकोर्टानं केलाय. मुंबई हायकोर्टाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्राला या प्रश्नाचं उत्तर देण्याचे निर्देश दिले.

मुंबई-गोवाकडे दुर्लक्ष का?

२०१७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ७०१ कि.मी. समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होत आलंय. तर दुसरीकडे सोलापूर-विजापूर या २५.५८ किमी महामार्गाचे काम १८ तासांत करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘लिम्का बुक’मध्ये रेकॉर्ड नोंदवलंय. परंतु, २०१०-११ पासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा या ५८१ किमी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम एक दशक उलटले तरी पूर्ण झालेलं नाही. सरकार कोकणवासीयांबरोबर भेदभाव करीत आहे, असा आरोप ओवेस पेचकर यांनी केला होता.

मुंबई गोवा महामार्गावर अनेक खड्डे आहेत. त्यामुळे अनेक अपघात होतात. लोकांना नाहक जीव गमवावा लागतो. वाहने खराब होतात. पर्यायाने वाहनमालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वाशिष्ठी नदीवरील नव्या पुलाचे काम ठप्प झाल्याने अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना होत आहे. गोवनवार्ता लाईव्हनेही या विषयची ग्राऊंड रिपोर्ट केला होता. दरम्यान, समृद्धी महामार्गाबाबत तक्रार करण्यासाठी सरकारने वेबसाइट उपलब्ध केली आहे. तशीच वेबसाइट मुंबई-गोवा महामार्गाबाबत तक्रार करण्यासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.

Special Report | Mumbai-Goa हायवे स्थानिकांच्या मुळावर

शुक्रवारी पुन्हा सुनावणी

मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलदगतीने करण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणांना द्यावेत. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आधीच्या महामार्गाच्या देखभालीचे व खड्डे भरण्याचे आदेश प्राधिकरणांना द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – एमव्हीआरला बसणार 28 कोटींचा फटका

हेही वाचा – सुट्टीवर निघालेले,पण वाटेतच काळानं गाठलं…

पाहा गोवानवार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!