हॅट्स ऑफ ; आता कुत्रा शोधणार कोरोनाचा रुग्ण !

RTPCR-रॅपिड टेस्टपेक्षाही जलद निदान ; फ्रान्सच्या वैज्ञानिकांचं संशोधन !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ‘तेरी मेहरबानियाॅं’ हा चित्रपट आपल्याला आठवत असेल, ज्यात कुत्रा आपल्या मालकाच्या खुनाचा बदला घेतो. खरंच, हा प्राणी किती काही करू शकतो, हे आपल्याला चित्रपटांमधून पाहायला मिळतंय. सध्या मात्र या प्राण्यानं आपलं कौशल्य पणाला लावलंय ते कोरोनाचा रूग्ण शोधण्यात. होय. आता कुत्रा हा प्राणी कोरोना रूग्णाचा शोध घेवू शकतो, तेही RTPCR आणि ऍटीजेनपेक्षाही अचूक आणि जलद.

कुत्रे इतकी अचूक देतात माहिती..

फ्रान्समधल्या वैज्ञानिकांनी यावर महत्वपूर्ण संशोधन केलंय. पॅरिसच्या नॅशनल व्हेटर्नरी स्कुल ऑफ एल्फोर्ड इंथ हे संशोधन करण्यात आलंय. रॅपिड टेस्टला किमान 15 मिनिटे लागतात, परंतु कुत्रे काही मिनिटात कोरोना रूग्णाचा शोध लावू शकतं. कुत्रा या प्राण्याची वास घेण्याची क्षमता खूप संवेदनशील असते. त्या क्षमतेच्या बळावर ते कोरोना झालाय की नाही याचं अचूक निदान अगदी 97 टक्क्यांपर्यंत करतात, असं सिद्ध झालंय.

यासंदर्भात अधिक माहिती देताना संशोधक डाॅमिनिक ग्रैंडजीन यांनी दिलेल्या माहितीनुसार,

कोरोना झालेल्या व्यक्तीच्या लाळेला आणि घामाला ठराविक असा वास येत असतो. त्यावरून कुत्रे कोरोना झाला की नाही, याची माहिती देतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!