हरीश (अण्णा) झाट्ये अनंतात विलीन, शासकीय इतमामात अखेरचा निरोप

शेकडो चाहत्यांनी घेतले अंतिम दर्शन

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : माजी खासदार माजी मंत्री हरीश झाट्ये यांच्यावर रविवारी डिचोलीत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. गेली ५० वर्षाहून अधिक काळ उद्योग ,सामाजिक शैक्षणिक सहकार व राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून गोमंतकीय जनतेच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या लाडक्या अण्णांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडोच्या संख्येने उपस्थिती लावली होती.

पाजवाडा इथं सलामी

यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, भाजप संघटन मंत्री सतीश धोंड, नरेश सावळ, फ्रान्सिस सिल्व्हेरा, डॉ शेखर साळकर, शेकडो चाहते, कार्यकर्ते तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार उद्योग जगतातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, नरेंद्र सावईकर, रमाकांत खलप, दीपक पाऊसकर, ग्लेन टिकली, जेसुई डिसौजा, शिल्पा नाईक, डॉ चंद्रकांत शेट्ये, गिरीश चोडणकर, मेघश्याम राऊत, दिलीप परुळेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अनिल होबळे, सुरेश वाळवे, मंत्री फिलिप नेरी, संजय शेट्ये, प्रेमानंद म्हाब्रे, गोपाळ सुर्लकर, जिल्हा सदस्य सरपंच पंच, विविध पक्षाचे नेते आणि चाहत्यांनी अंतिम दर्शन घेतलं.

मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

यावेळी झालेल्या शोकसभेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी २५ वर्षांपूर्वीच ग्रामीण भागात उच्च शिक्षण सेवा तसेच आधुनिक गोव्यासाठी अनेक योजना आखणाऱ्या अण्णांना अभिवादन केलं. राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण हे अण्णा झाट्ये होते. सेवाभाव आपुलकीचे नातं आणि जनतेसाठी सतत मदतीचा हात देणारे हरीश झाट्ये यांच्या निधनाने गोव्याची मोठी हानी झाली आहे. पक्षविरहीत त्यांनी सर्वानाच मदत केल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी झाट्ये यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सभापती राजेश पाटणेकर म्हणाले की…

अण्णांनी आपले जीवन जनसेवेसाठी खर्ची घालताना हजारो परिवारांना मोठा आधार दिला. त्यांनी शिक्षण सहकार उद्योग कला क्रीडा संस्कृती आदी चौफेर क्षेत्रात दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!