हरीष गावस यांनी घेतला वाळपई पोलिस स्थानकाच्या ‘पीआय’ पदाचा ताबा

पीआय सागर एकोस्करांच्या जागी हरीष गावस यांची नियुक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वाळपई पोलिस स्थानकाच्या पीआय पदाचा ताबा हरीष गावस यांनी सोमवारी घेतला. पीआय सागर एकोस्करांच्या जागी हरीष गावस यांची नियुक्ती करण्यात आलीय. सागर एकोस्करांना मायणा कुडतरी पोलीस स्टेशनच्या पीआय पदाचा ताबा देण्यात आलाय.

हेही वाचाः BREAKING | ठाकरेंना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य चांगलंच शेकलं; नारायण राणेंना अखेर अटक

गावस यांची ‘या’ महत्त्वाच्या पोलिस स्थानकांमध्ये म्हणून यशस्वी कारकीर्द

हरीष सावंत हे २००६ साली पोलीस खात्यात रुजू झाले. सुरुवातीला त्यांनी पणजीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर कळंगुट, वास्को अशा गोव्यातील महत्त्वाच्या पोलिस स्थानकांमध्ये पीएसआय म्हणून यशस्वी काम केलं. याच कामगिरीच्या जोरावर त्यांना गेल्याच वर्षी पीआय पदावर बढती मिळाली. सुरुवातीला त्यांनी डिचोली सीआयडी विभागात सेवा बजावली‌. आणि आता त्यांची वाळपई पोलिस स्थानकाच्या पीआयपदी नेमणूक करण्यात आलीय. मागील १६ वर्षं ते पोलिस खात्यात सेवा देत आहेत.

‘या’ कारणासाठी हरीष गावस यांच्या नेमणूकीला महत्व

अभिमानाची गोष्ट म्हणजे हरीष गावस हे सत्तरी तालुक्यातील दाबे या गावचे सुपुत्र आहेत. सत्तरीतल्याच व्यक्तीची तालचक्यातील पोलिस स्थानकाच्या पीआयपदी झालेली नेमणूक ही अशा तऱ्हेची पहिलीच नेमणूक आहे. एका लहानशा गावातून शिक्षण घेत हरीष गावस यांनी ही यशस्वी वाटचाल केल्यानं लोकांकडून त्यांच कौतूक होत आहे. सत्तरीतीलच नाही तर गोव्याच्या ग्रामीण भागातील युवकांसाठी हरीष गावस हे एक आदर्श उदाहरण ठरल्याचं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.

हेही वाचाः स्टेरिओ चोरी प्रकरणः संशयितांना 8 दिवसांची पोलिस कोठडी

‘गोवन वार्ता लाईव्ह’कडून पीआय हरीष गावस यांच अभिनंदन

वाळपईच्या पीआयपदी नेमणूक झाल्याबद्दल ‘गोवन वार्ता लाईव्ह’चे सिनीयर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी हरीष गावस यांचं अभिनंदन केलं. लोकशाहीत पोलिस आणि पत्रकार हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. हे दोन्ही घटक जर एकामेकांच्या सहयोगाने समाजातील वाईट गोष्टींविरोधात किंवा चांगल्या बदलासाठी एकत्र आले, तर ती फार मोठी गोष्ट ठरते‌. अशा तऱ्हेच्या चांगल्या कामांसाठीचा सहयोग सदैव मिळेल अशी ग्वाही विश्वनाथ नेने यांनी हरीष गावस यांना ‘गोवन वार्ता लाईव्ह’च्यावतीने दिली. यावेळी पत्रकार देवेंद्र गांवकर हेही उपस्थित होते.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!