राज्यपालांकडून जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा

अनाथालये आणि डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दीर्घायुष्य आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात,

राष्ट्रसेवेसाठी आणि लोक कल्याणासाठी समर्पित असा द्रष्टे नेता लाभल्याने देश धन्य झाला आहे. कोविड -१९ महामारीच्या उत्तम व्यवस्थापनासाठी आणि आत्मनिर्भर भारत या संपूर्ण विकसित भारताच्या कल्पनेसाठी पंतप्रधानांचं कौतुक, असं राज्यपाल म्हणालेत.

अनाथालये आणि डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीची घोषणा

राज्यपालांनी यावेळी ७१ वृद्धाश्रम, अनाथालये आणि अशा इतर संस्थांना आर्थिक मदत जाहीर केली. पुढे राज्यपालांनी ७१ व्यक्तींना राज्य भवनातून डायलिसिस उपचारांसाठी राज्यपालांच्या डिस्क्रेशनरी फंडातून आर्थिक मदत घोषित केली. इच्छुक व्यक्ती/संस्थांनी संस्थेच्या सर्व वैयक्तिक तपशील उपक्रमांसह अर्ज करावा. डायलिसिस उपचारांच्या बाबतीत ज्या रुग्णावर उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयांचा उल्लेख करावा.

अर्ज राज्यपालांच्या सचिवांच्या नावे ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी सादर करावे. प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्त्वावर आर्थिक सहाय्य मंजूर केले जाईल.

हा व्हिडिओ पहाः Important | Tourism ओळख असलेल्या Goaला काळजी करायला लावणारी बातमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!